Join us

‘फांदी’ आज चित्रपटगृहात,अशी आहे सिनेमाची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 5:06 PM

श्रद्धेचा गैरवापर करून त्याच बाजारीकरण करणा-या प्रवृत्तींवर प्रहार करणाऱ्या ‘फांदी’ मध्ये काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी अंधश्रद्धेचं जाळं कशाप्रकारे पसरवतात हे दाखवतानाच एका कुटुबांची राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून केली जाणारी फसवणूक दाखवण्यात आली आहे. 

श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असले तरी कित्येकदा याच मानसिकतेचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अशाच एका घटनेचा वेध घेत, राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाची कथा आज प्रदर्शित झालेल्या ‘फांदी’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. ध्वज क्रिएशन प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित साबळे यांनी केले आहे.

श्रद्धेचा गैरवापर करून त्याच बाजारीकरण करणा-या प्रवृत्तींवर प्रहार करणाऱ्या ‘फांदी’ मध्ये काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी अंधश्रद्धेचं जाळं कशाप्रकारे पसरवतात हे दाखवतानाच एका कुटुबांची राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून केली जाणारी फसवणूक दाखवण्यात आली आहे.  अरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे,  कुणाल विभुते, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

कुणाल-करण यांनी लिहिलेल्या गीतांना त्यांनीच संगीतबद्ध केले आहे. आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर या गायकांनी ही गीते स्वरबद्ध केली आहेत. सायली शशिकांत पाटणकर या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या असून राजेश खारकर, सायली पाटणकर, महेंद्र सोमासे निर्माते आहेत. छायाचित्रण संजय बापू थोरात तर संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. कलादिग्दर्शन राहुल व्यवहारे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश सरवणकर यांचे आहे. भूषण आंगणे, मृणाली साबळे, विठोबा तेजस, अमोल देसाई, सचिन गायकवाड, जितेंद्र जे.बांभानिया, अनिल शिंदे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.