सईचे एक पाऊल पुढे !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2016 5:01 PM
प्रत्येकाचा फेसबुक हा अगदी जिव्हाळ््याचा विषय आहे. त्यात कलाकारांसाठी सोशलमीडिया तर अगदी फायदेशीर माध्यम म्हणावे लागेल. कारण कलाकारांना चाहत्यांपर्यत ...
प्रत्येकाचा फेसबुक हा अगदी जिव्हाळ््याचा विषय आहे. त्यात कलाकारांसाठी सोशलमीडिया तर अगदी फायदेशीर माध्यम म्हणावे लागेल. कारण कलाकारांना चाहत्यांपर्यत पोहोचण्यासाठी सोशलमीडिया हे अधिक सोईचे माध्यम मानले जाते. त्यात जर थेट कोणाला फेसबुकच्या आॅफीसला मिळण्याची संधी मिळाली तर सोन्यापेक्षा पिवळेच समजा. अशीच काहीशी संधी मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांच्या वाटयाला आली असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये संजय जाधव, चिराग पाटील, सायली पंकज, भूषण पाटील, मयूरी वाघ, उमेश जाधव, प्रिया बापट या कलाकारांचा समावेश आहे. आता या लिस्टमध्ये प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचादेखील समावेश झाला आहे. मात्र सई या सर्वामध्ये एक पाऊल पुढे असल्याची पाहायला मिळाली. सईने नुकतेच या प्रत्यक्षात फेसबुकच्या आॅफीसला भेट दिली. एवढेच नाही तर तिने फेसबूक आॅफीसमधून बसून चाहत्यांशी फेसबूकवरून लाईव्ह चाट करणारी पहिली अभिनेत्रीदेखील ठरली आहे. तिच्या या अनुभवाविषयी सई लोकमतला सांगते, हा अनुभव माझ्यासाठी खरचं खूपच छान होता. या लाइव्ह चाटमध्ये चाहत्यांनी २०१६ आणि फेसबूक या गोष्टींवर भरपूर गप्पा मारल्या आहेत. तसेच लाईव्ह चाट करताना खूप मजा आली. काहींनी गमंतीशीर गप्पादेखील मारल्या आहेत. २०१६ वर्षातील चित्रपट, आगामी प्रोजेक्ट अशा सर्व विषयांवर मनसोक्तपणे गप्पाटप्पा केल्या आहेत. तो संवादाचा एक तास माझ्यासाठी खरचं खूप अभिमान वाटणारा होता. तसेच फेसबूकचे आॅफीसदेखील खूप अवाढव्य होते. प्रत्यक्षात काम करताना एक आॅफीस कसे सकारात्मकदृष्टया पाहिजे याचे ते खास उदाहरण होते. सईला मॅनेज करणाºया एजन्सीने पुढाकार घेऊन सईचे हे लाईव्ह चॅट घडवून आणले. अर्थातच सईचा फॅन फॉलोविंग जास्त असल्यामुळे तिच्या या लाईव्ह चॅटला प्रतिसाददेखील तितकाच जबरदस्त मिळाला आहे. एका तासात तिला १० लाखच्या वरती व्युज मिळाले आहे.