Join us  

​ स्ट्रगलर्सचे नवीन वर्षात सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 12:22 PM

आपल्या विनोदी अभिनय शैलीमुळे धमाल मजा मस्ती करुन प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा अभिनेता कुशल बद्रिके स्ट्रगलर साला या ...

आपल्या विनोदी अभिनय शैलीमुळे धमाल मजा मस्ती करुन प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा अभिनेता कुशल बद्रिके स्ट्रगलर साला या वेब सिरिजमध्ये गेल्या काही दिवसांपासुन संतोष जुवेकर सोबत दिसत आहे. ही वेब सिरिज काही दिवस बंद होती. परंतू नेटिझन्सच्या आग्रहाखतर पुन्हा एकदा या वेब सिरिजचे एपिसोड करण्यात आले. लवकरच ही वेब सिरिज सुरु हाणार असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. त्यामुळे आता प्रेक्षकांसाठी एक खुषखबर आहे. नवीन वर्षामध्ये हे स्ट्रगलर्स पुन्हा एकदा काम मागण्यासाठी सज्ज होणार अहेत. स्ट्रगलर्सचे डबिंग सध्या कुशल बद्रिके करीत असल्याचे समजतेय. कुशल सांगतोय, नवीन वर्षात आम्ही येतोय... पुढील वर्षात थंडी पण येतेय आणि आम्ही पण येतोय... १ जानेवारीला स्ट्रगलर्सचा एपिसोड दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे आता हे स्टगलर्स कोणत्या दिग्दर्शकांकडे आपले नशीब आजमाविण्यासाठी जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या वेब सिरिजचा जमाना आहे. बºयाच वेब सिरिजमध्ये आपल्याला कलाकार काम करताना दिसत आहेत. मालिका, चित्रपट, नाटक या सर्व गोष्टी सांभाळत कलाकार वेब सिरिजच्या एपिसोडमध्ये धुमाकुळ घालताना पाहायला मिळतात. नेटिझन्सना तर वेब सिरिज हा एक चांगलाच करमणुकीचा विषय झाला आहे. अनेक जणांच्या पसंतीस या वेब सिरिज येत असल्याने बºयाचशा कलाकारांचा वेब सिरिज करण्याकडे कल झुकलेला असल्याचे दिसतेय. स्ट्रगलर साला ही एक हटके आणि भारी वेब सिरिज असल्याने नेटिझन्सना खिळवून ठेवण्यासाठी कुशल आणि संतोष यावेळी काय नवीन करणार हे आपल्याला १ जानेवारीलाच कळणार आहे. या स्ट्रगलर्सच्या नवीन वर्षातील भन्नाट सरप्राईजसाठी आता सर्वजणच तयार रहा.