दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकमधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. ‘सुभेदार’च्या टीमकडूनही चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी प्रदर्शित झाल्यानंतर ‘सुभेदार’बाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली होती. सुभेदार’ सिनेमा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. रिलीज अवघ्या २ दिवस शिल्लक असताना सिनेमाने एक नवा विक्रम केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा होते आहे.
सिनेमाला रिलीज व्हायला अजून दोन दिवस बाकी असताना या सिनेमाला बुक माय शोवर तब्बल ४० हजारांहून अधिक लाईक्स मिळवले आहे. असा विक्रम करणारा ‘सुभेदार’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. त्यामुळे सिनेमाचं आणि त्यातील कलाकारांचं सर्वत्र कौतूक होतं आहे. सिनेमाच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचं आभार मानले आहेत.
स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाद्वारे आपल्याला पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीरधर्माधिकार, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, शिवानी रांगोळे,नूपुर दैठणकर, भूषण शिवतरे, श्रीकांत प्रभाकर, बिपीन सुर्वे, अलका कुबल, राजदत्त, ऐश्वर्या शिधये, सौमित्र पोटे, संकेत ओक, सुनील जाधव, मंदार परळीकर, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, दिग्विजय रोहिदास, रिषी सक्सेना, ज्ञानेश वाडेकर, मृण्मयी देशपांडे, दिग्पाल लांजेकर, आस्ताद काळे, पूर्णानंद वाडेकर आदि मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.
‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत