बहुचर्चित 'सुभेदार' हा ऐतिहासिक मराठी सिनेमा सध्या सर्वत्र गाजत आहे. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची कथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अजय पूरकर यांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. याआधी त्यांनी 'पावनखिंड' चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली होती. पावनखिंड आणि 'सुभेदार' मधून प्रसिद्धी मिळवलेले अजय पूरकर आता दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहेत.
अजय पूरकर 'स्कंदा' या चित्रपटातून त्यांच्या दाक्षिणात्य मनोरंजनविश्वातील कारकीर्दीला सुरुवात ते सुरुवात करणार आहेत. या चित्रपटात ते महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. स्कंदा या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक बोयापती श्रीनू यांनी अजय पूरकर यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' चित्रपटाचा उल्लेखही केला. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ अजय पूरकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला...
अजय पूरकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत बोयापती श्रीनू अभिनेत्याची ओळख करुन देत त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. "हे अजय पूरकर आहेत. मराठी रंगभूमीवरील एक उत्कृष्ट कलाकार. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तान्हाजी मालुसरे यांच्या व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. त्यांनी आपल्या 'स्कंदा' चित्रपटातही चांगला अभिनय केला आहे. त्या भूमिकेबद्दल आता मी काही सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. त्यांचा सुभेदार हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे," असं म्हणत त्यांनी अजय पूरकर यांचं कौतुक केलं आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला, "किती काळ काठावर उभं राहून..."
'स्कंदा' हा दाक्षिणात्य चित्रपट तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बोयापती श्रीनू दिग्दर्शित हा चित्रपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राम पोथिनेनी सई मांजरेकर, श्रीलीला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.