Join us

Subodh Bhave Birthday Special : सुबोध भावेने त्याच्या बालमैत्रिणीसोबत केले आहे लग्न, अशी आहे त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 7:30 PM

सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी आणि त्याची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता.

ठळक मुद्देमंजिरीला पाहाताच क्षणी सुबोध तिच्या प्रेमात पडला होता आणि शाळेत असतानाच त्याने मंजिरीला प्रपोज केले होते. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर त्याने शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून देत मंजिरीला प्रपोज केले होते.त्यांनी त्यांच्या प्रेमाची कल्पना कुटुंबियांना देखील दिली. पण तुम्ही शिक्षण पूर्ण करा असा सल्ला त्यांच्या कुटुंबियांनी दिला आणि मंजिरी बारावीत असताना कॅनडाला शिफ्ट झाली.

सुबोधचा आज म्हणजेच ९ नोव्हेंबरला वाढदिवस असून १९७५ ला पुण्यात त्याचा जन्म झाला. त्याने त्याचे शिक्षण पुण्यातील सिम्बोसिस कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्याने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी कंपनीत सेल्समनचे काम देखील केले होते. 

सुबोधचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, त्याची पत्नी मंजिरी आणि त्याची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सुबोधला अभिनय येत नसल्याने त्याला नाटकातून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तो बॅकस्टेजचे काम करत होता तर मंजिरी नाटकात काम करत होती. तिला पाहाताच क्षणी सुबोध तिच्या प्रेमात पडला होता आणि शाळेत असतानाच त्याने मंजिरीला प्रपोज केले होते. त्या दोघांची शाळा वेगळी होती. त्यामुळे सुबोध मंजिरीला पाहण्यासाठी नाक्यावर उभा राहायचा. त्यावेळी त्यांच्यात केवळ नजरानजर व्हायची. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर त्याने शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून देत मंजिरीला प्रपोज केले होते. त्यावर मंजिरीने मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर माझा होकार असेल असे सुबोधला सांगितले होते आणि ती खरंच त्या पुलावर आली आणि सुबोधला उत्तर मिळाले. त्यांनी त्यांच्या प्रेमाची कल्पना कुटुंबियांना देखील दिली. पण तुम्ही शिक्षण पूर्ण करा असा सल्ला त्यांच्या कुटुंबियांनी दिला आणि मंजिरी बारावीत असताना कॅनडाला शिफ्ट झाली. त्या दरम्यान पत्रांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क असायचा. कॅनडातून परतल्यावर त्या दोघांनी पुण्यात एकाच ठिकाणी नोकरी केली आणि त्यानंतर साखरपुडा केला. लग्न झाले त्यावेळी सुबोध नोकरी करत होता. पण नंतर कामात मन रमत नसल्याने त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनयाला दिला. 

सुबोध भावेने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सुबोधने कॉलेज जीवनापासूनच एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली. त्याला त्यावेळी अनेक पारितोषिकं मिळाली होती. त्याने अभिनय करण्यासोबतच दिग्दर्शन देखील केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट चांगलाच गाजला होता. सध्या त्याची तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. त्याचसोबत त्याचा आणि काशिनाथ घाणेकर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील सुबोधची भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. सुबोधने आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक खास जागा निर्माण केली आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहे. त्याने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 

टॅग्स :सुबोध भावे तुला पाहते रेआणि डॉ. काशिनाथ घाणेकर