यांनाही कळतं....माणसांना कधी कळणार?, सुबोध भावेची पोस्ट पाहून तुम्हीही असंच म्हणाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:29 PM2021-09-17T17:29:24+5:302021-09-17T17:39:15+5:30

छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या दर्जेदार भूमिकांनी सुबोधने रसिकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही तो बराच सक्रीय असतो.आपले सिनेमा आणि विविध गोष्टींबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मत मांडताना दिसतो.

Subodh bhave gave a very important message of wearing a mask, says | यांनाही कळतं....माणसांना कधी कळणार?, सुबोध भावेची पोस्ट पाहून तुम्हीही असंच म्हणाल

यांनाही कळतं....माणसांना कधी कळणार?, सुबोध भावेची पोस्ट पाहून तुम्हीही असंच म्हणाल

googlenewsNext

आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे. छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या दर्जेदार भूमिकांनी सुबोधने रसिकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही तो बराच सक्रीय असतो.आपले सिनेमा आणि विविध गोष्टींबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मत मांडताना दिसतो.

नुकतंच त्याने सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. सुबोधने माकडाचा मास्क लावलेला फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. ''यांनाही कळतं....!'' या कॅप्शनसह त्याने तो फोटो शेअर केला आहे.  हा फोटो पाहून प्राण्यांनाही कळतं पण माणसांना कधी कळणार असं तुम्हालाही वाटेल.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाहीय. कोरोनाची पहिली लाट गेली, करोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरते आहे तर करोनाची तिसरी लाटही धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळेच सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणं, हात सतत धुणं, खोकताना- शिंकताना रुमाल टिश्यु वापरणं,नाक तोंड, डोळ्यांना हात लावणं टाळणं. अशा अनेक गोष्टी सांगत कलाकारही चाहत्यांना जागृत करत असतात. यामुळे स्वतःची आणि दुसऱ्यांचीही काळजी घेऊयात असे आवाहन करताना दिसतात. मात्र कोणीही यावर फार लक्ष देताना दिसत नाही. कोरोनाचे सगळे नियम  सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. कोरोनाविषयी घेतली जाणारऱ्या खबरदारीचा विसर आता हळूहळू माणसाना पडू लागलाय. 

आजही कित्येक लोकं योग्य खबरदारी पाळताना दिसत नाही. आजही सुरक्षित अंतर ठेवले जात नाही, स्वच्छताही फारशी पाळली जात नाही. कित्येक लोक विना मास्कच घराबाहेर पडतात हीच गोष्ट अधोरिखित करणारा फोटो सुबोध भावने शेअर केला आहे. माणसांना जरी कोरोना कळला नसला तरी प्राण्यांना मात्र हा जीवघेणा संसर्ग नक्कीच कळला आहे हेच सांगण्याचा प्रयत्न सुबोधच्या या पोस्टमधून करण्यात आला आहे. 

कोरोनासोबत जगायचं नसेल तर कोरोना रोखण्यासाठी नियमांचं पालन करणं गरजेच आहे. हा जीवघेणा संसर्ग थांबवायचा असेल तर अजूनही वेळ हातात आहे. सुरक्षित राहण्यासाठी योग्य नियमांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.  

Web Title: Subodh bhave gave a very important message of wearing a mask, says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.