Join us

आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटात काम करण्यासाठी या कारणामुळे सुबोध भावेने दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 7:15 AM

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली असून तो ही व्यक्तिरेखा जगला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

ठळक मुद्देडॉ. काशिनाथ घाणेकर यांचा लुक, संवाद फेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड हे अतिशय उत्तमप्रकारे सुबोध भावेने त्याच्या अभिनयाद्वारे पडद्यावर साकारले आहेया चित्रपटातील त्याच्या निळ्या डोळ्यांचे तर विशेष कौतुक होत आहे. मी भूमिकेसाठी लेन्स लावणार नाही तू वीएफएक्सचा वापर कर... असे मी अभिजीत देशपांडेला सुचवले होते असे सुबोध सांगतो.

वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या टीझरपासून चित्रपटामधील संवाद, गाणी यांची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली होती. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा एकदम कडक रिस्पोन्स मिळतो आहे. चित्रपटामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या उदय – अस्ताचा प्रवास दाखविण्यात आला आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली असून तो ही व्यक्तिरेखा जगला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा लुक, संवाद फेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड हे अतिशय उत्तमप्रकारे सुबोध भावेने त्याच्या अभिनयाद्वारे पडद्यावर साकारले आहे आणि हेच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात काम करण्यासाठी सुबोधने नकार दिला होता. सुबोधने या चित्रपटात काम न करण्यामागे एक खास कारण होते. 

सुबोधचा आणि काशिनाथ घाणेकर या चित्रपटातील लूक सगळ्यांनाच आवडत आहे. या चित्रपटातील त्याच्या निळ्या डोळ्यांचे तर विशेष कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी लेन्सेसचा वापर करण्यासाठी सुबोध तयारच नव्हता आणि केवळ याच कारणामुळे त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. सुबोधने नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितले, या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मी लगेचच या चित्रपटासाठी होकार कळवला. पण दिग्दर्शकाशी चर्चा झाल्यानंतर माझ्या डोक्यात पहिल्यांदा हीच गोष्ट आली की, घाणेकरांचे डोळे हे निळे होते. त्यामुळे मला लेन्स लावायला लागणार. त्यामुळे मी भूमिकेसाठी लेन्स लावणार नाही तू वीएफएक्सचा वापर कर... असे मी अभिजीत देशपांडेला सुचवले. त्याप्रमाणे माझे काही फोटो वापरून डोळ्यांचा रंग बदलण्यात आला. पण त्याचा खर्च प्रचंड असल्याने चित्रपटाच्या टीमसाठी ते शक्य नव्हतं. त्यामुळे विक्रम गायकवाड यांच्या मदतीने मी लेन्सेस वापरण्याचा निर्णय घेतला. अनेक लेन्सेसचे ट्रायल केल्यानंतर घाणेकरांच्या डोळ्यांच्या रंगाशी सार्धम्य असणारे लेन्स वापरण्यात आले. 

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात सुबोध भावेसोबतच प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, वैदही परशुराम, नंदिता धुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :आणि डॉ. काशिनाथ घाणेकरसुबोध भावे