Join us

सुबोध भावेची सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 5:46 PM

अलौकिक कामगिरीची दखल म्हणून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर सुबोधची निवड करण्यात आली आहे.

आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे. छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या दर्जेदार भूमिकांनी सुबोधने रसिकांची मनं जिंकली आहेत.आता त्याच्या अलौकिक कामगिरीची दखल म्हणून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक  विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर सुबोधची  निवड करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक  विकास महामंडळाच्या  संचालक मंडळावर संचालक सुबोधची  नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली असून सुबोध भावेचे नाव या पदासाठी निश्चित करण्यात आल्याचे समजतंय. संचालक समितीमध्ये पाच जणांची निवड करण्यात आली असून यामध्ये अभिनेत्री निशा परूळेकरचाही समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये हे संचालक मंडळ कार्यरत असेल. 

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला सुबोध भावे आला होता धावून, अशा रितीने केली होती मदत

सुबोध भावे यांने कोल्हापूर आणि सांगलीकरांना मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील सर्व कलाकार नेहमीच तुमच्यासोबत आहोत असा विश्वास दिला होता. सुबोधने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, की, ''फक्त पैसे देऊन काम संपणार नाही हे माहिती आहे पण किमान सुरवात होते हे महत्त्वाचं. सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन पुढील काही दिवसात संकटात सापडलेल्या आमच्या बांधवांसाठी निश्चित आणि ठोस अशा जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या.  सुबोधने उचलेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. 

टॅग्स :सुबोध भावे