Join us

Video: सुबोध भावेचा बायकोसाठी रोमँटिक व्हिडिओ, ३३ वर्षांपुर्वीच्या आठवणी केल्या ताज्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 09:35 IST

३३ वर्षांपुर्वी सुबोध कसा दिसायचा, याची झलक तुम्ही बातमीवर क्लिक करुन बघू शकता. सुबोधच्या या व्हिडीओवर त्याच्या फॅन्सनी भरभरुन कमेंट केल्या आहेत (subodh bhave)

सुबोध भावे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. सुबोधला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सुबोधने गेल्या काही वर्षांत मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेमांमध्येही अभिनय केलाय. सुबोध सोशल मीडियावर त्याच्या आयुष्यातले विविध अपडेट्स शेअर करत असतो. सुबोधने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो ३३ वर्षांपुर्वी किती हँडसम आणि देखणा दिसायचा याचा अंदाज तुम्हाला येईल.

सुबोधने शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळतं की, त्याने एक खास फिल्टर वापरलं असून ३३ वर्षांपुर्वी तो कसा दिसायचा याची झलक बघायला मिळते. सुबोधने या व्हिडीओत मंजिरीला त्याने ३३ वर्षांंपुर्वी ६ मेला प्रपोज केलं होतं, त्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. याशिवाय मंजिरी कॅनडाला गेल्यावर झालेल्या पत्रव्यवहार सुबोधने सांगितला आहे. 

या व्हिडीओला सुबोधने खास कॅप्शन दिलंय. सुबोध लिहितो, "मंजिरी, ३३ वर्षांपूर्वी आपलं प्रेमाचं नातं खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि 'जगण्यासाठी श्वासाची नाही प्रेमाची गरज असते', हे मला कळलं. आपली ही एक गोड आठवण आज मी तुझ्यासोबत नव्याने शेअर करतोय, पण जराशा हटके पद्धतीत. हा खास व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी…."  सुबोधच्या या व्हिडीओवर त्याच्या फॅन्सनी भरभरुन कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :सुबोध भावे मराठीमराठी अभिनेता