‘What’s up लग्न’ चित्रपटाचे यशस्वी ५० दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 11:43 AM
कथा, निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण व अभिनय यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. प्रत्येकजण रिलेट करू शकेल ...
कथा, निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण व अभिनय यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. प्रत्येकजण रिलेट करू शकेल अशी कथा... तितकेच परफेक्ट दिग्दर्शन... वैभव आणि प्रार्थनाची केमिस्ट्री... सहकलाकारांची लाभलेली उत्तम साथ तसेच निर्मात्यांनी आणि प्रस्तुतकर्त्यांनी केलेल्या हटके आणि नेमक्या मार्केटिंगमुळे ‘What’s up लग्न’ या चित्रपटाने आपले यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट दोन तीन आठवडे चालतात अशावेळी ‘What’s up लग्न’ जेव्हा ५० दिवस पूर्ण करतो तेव्हा ती प्रेक्षकांनी दिलेली पोचपावतीच म्हणायला हवी.चित्रपटाचा फ्रेश लुक, हलकी-फुलकी प्रेमकथा, नयनरम्य लोकेशन्स आणि आजच्या काळात सर्व जोडप्यांना लागू पडेल असा मार्मिक संदेश या सगळ्या युएसपीमुळे ‘What’s up लग्न’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी आपल्या पदार्पणातच ‘What’s up लग्न’ या चित्रपटातून आजच्या तरुणाईची मानसिकता, लग्न संस्काराविषयीचे मत, त्या विषयीचे विचार अतिशय तरलतेने मांडण्याचा प्रयत्न केला असून, तो प्रेक्षकांना खूपच भावत आहे.१६ मार्चला रिलीज झालेल्या या चित्रपटाला सलग आठव्या आठवड्यातसुद्धा प्रेक्षकांची दाद मिळत असून वितरक राहुल हकसर आणि त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य यामागे आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस यांची प्रस्तुती असणाऱ्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाने कथेपासून ते अगदी प्रसिद्धीपर्यंत दाखवलेल्या हटके प्रयत्नांमुळे या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु आहे. या चित्रपटात वैभव, प्रार्थना, विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहारायकर, अश्विनी कुलकर्णी, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकारांसोबत सुनील बर्वे, सविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत.सिनेमातील रोमँटिक गाणी म्हटली की, रसिकांच्या मनात २ नावं सहज येतात – संगीतकार निलेश मोहरीर आणि गीतकार अश्विनी शेंडे !!! या सांगीतिक जोडीने कितीतरी मधाळ गाणी मराठी रसिकांना दिलीयेत. इतकी सुंदर रोमँटिक गाणी दिल्यानंतरही, प्रत्येक नवीन गाणं तितकंच फ्रेश मिळणार यात रसिकांना कधीच शंका नसते.‘What’s Up लग्न’ या चित्रपटासाठी सुद्धा या जोडीने ही किमया साधली आहे.‘तू जराशी ये उराशी’ या गाण्यातून या जोडीने प्रेमा मागाची उत्कटता! व त्यातील भावनेची खोली याचा सुरेख मेळ साधला आहे. प्रत्येक गाण्याची स्व:ताची अशी एक खासियत असते. ‘तू जराशी ये उराशी’ या गाण्याची खासियत म्हणजे आधी चाल बांधून नंतर ते शब्दबद्ध करण्यात आलं. हनिमून हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं वळण असतं. एकमेकांच्या सहवासातून फुलणारं प्रेम व्यक्त करणार हे गाण्याने प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतला आहे.