महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या आदेश बांदेकर यांची महाराष्ट्रभर क्रेझ आहे. संपर्ण महाराष्ट्रात त्यांचे चाहते आहेत. नुकतेच आदेश बांदेकर यांनी (१८ जानेवारी) रोजी त्यांचा ५८वा वाढदिवस साजरा केला. वडिलांच्या वाढदिवशी त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने खास पोस्ट केली आहे.
सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा! आपली जशी शूजची साइज् सेम आहे. तसेच मला माझ्या मनाची साइज् तुझ्या मनाएवढी मोठी करण्याची इच्छा आहे! आणि जर त्यात थोडीही वाढ झाली तरी माझा 2024 सत्कारणी लागला असे वाटेल'. सोहमच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांच्याप्रमाणेच सोहमदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. नवे लक्ष्य मालिकेतून सोहमने कलाविश्वात पदार्पण केलं. सध्या तो ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती करत आहे. सोहम अलिकडेच बाईपण भारी देवा या सिनेमात कॅमियो रोलमध्ये दिसला होता. या सिनेमात त्याची आई अभिनेत्री सुचित्रा बांदेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या होत्या.
सोहम हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो कायम फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसेच आपलं आई-वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी तो सोडत नाही. अनेकदा तो लाइव्ह किंवा आस्क मी एनिथिंग यासारखे सेशन घेऊन चाहत्यांसोबत थेट संपर्क साधत असतो.