हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापूढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. काहींनी या निर्णयाचे स्वागत केलं तर काहींनी विरोध केला. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
प्राजक्ताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयाला पाठिंबा देत स्वातंत्र्यदिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या घराच्या खिडकीमध्ये अभिनेत्रीने तिरंगा फडकावला आहे. त्यासोबतचा फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिलं, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव....स्वातंत्र्यदिन चिरायू होवो ...माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता , परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो …
प्राजक्ताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. अनेकांनी तिला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडपासून ते मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रेटी मंडळींनी ७५ व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला यावेळी तिंरग्यासोबतचे फोटोही त्यांनी शेअर केले.