Join us

"ब्राह्मण असून नॉनव्हेज खाता?" युझरच्या प्रश्नावर सुकन्या मोनेंनी दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 3:11 PM

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच सुकन्या कुलकर्णी यांना एक छानसं गिफ्ट हॅम्पर पाठवलं.

मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी (Sukanya Kulkarni Mone) सध्या 'बाईपण भारी देवा' सिनेमामुळे चर्चेत आहे. सहा बायकांचा हा सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सुकन्या मोने यांनी सिनेमात साधना ही व्यक्तिरेखा साकारली आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, सासऱ्यांच्या धाकाखाली असलेली, बहिणीच्या वशिल्याने बँकेत रुजू झालेली अशी ही महिला असते. सुकन्या मोने यांनी साधनाची भूमिका खूपच रंजक पद्धतीने साकारली आहे. सध्या सिनेमातील सर्वच कलाकारांवर त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे कौतुकाचा वर्षाव होतोय.

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच सुकन्या कुलकर्णी यांना एक छानसं गिफ्ट हॅम्पर पाठवलं. सिनेमाला मिळालेल्या यशासाठी तिने हे गिफ्ट दिलं. सुकन्या कुलकर्णी यांनी गिफ्ट हॅम्परचा व्हिडिओ पोस्ट करत अमृताचे सोशल मीडियावर आभार मानले. 'किती छान अमृता..तुझ्या सुकुताईला..तायडेला एकदम खूश केलंस..किती सुंदर आहे हे सगळं...असं कौतुक करणारा विरळाच...असेच प्रेम कायम असू दे.' असं कॅप्शन त्यांनी पोस्टखाली लिहिलं.

तर या पोस्टवर एका युझरने मात्र भलतीच कमेंट केली. 'तुम्ही ब्राह्मण असून सुद्धा मांसाहारी पदार्थ खाता, मला वाईट वाटलं ऐकून.' अशी कमेंट युझरने केली. त्यावर सुकन्या यांनी रोखठोक उत्तर देत लिहिलं, 'सॉरी कोणी सांगितले मी मांसाहारी खाते? आणि कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का? आणि ते चांगल की वाईट हेसुद्धा ज्याचे त्याने ठरवायचे असते. मी शाकाहारी आहे'.

सुकन्या मोने यांनी आपल्या शैलीत उत्तर देत युझरची बोलतीच बंद केली. त्यांच्या उत्तराचं इतर नेटकऱ्यांनीही कौतुक केलं. सुकन्याताई अभिनयाव्यतिरिक्त उत्तम डान्स सुद्धा करतात. त्यांना आधीपासूनच भरतनाट्यमची आवड असून त्यांनी प्रशिक्षणही घेतलं आहे.

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीमराठी अभिनेतामराठी चित्रपटसोशल मीडियाट्रोल