Join us

ही मराठमोळी अभिनेत्री म्हणतेय- अगले जनम मोहे बिटिया हि किजो, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 2:59 PM

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते.

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर. सोशल मीडियावर सुखदा बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. अलीकडेच सुखदाने इन्स्टाग्रामवर तिचा ट्रेडिशनल लूकमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोतील कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. काल जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत सुखदाने हा फोटो शेअर केला आहे. अगले जनम मोहे बिटिया हि किजो। असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. सुखदाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. सुखदा अभिनेता अभिजीत खांजकेकरची पत्नी आहे. सुखदा अभिजीतसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.

टॅग्स :सुखदा खांडकेकरअभिजीत खांडकेकर