Join us  

सुमेधने या सिनेमासाठी केला लूक चेंज,पिळदार बॉडी कमावण्यासाठी घेतोय इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 7:18 AM

आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या अभिनेत्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत काही कमी नाही. मात्र अशा कोणत्याही गोष्टी नसतानाही आपल्यात असलेल्या ...

आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या अभिनेत्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत काही कमी नाही. मात्र अशा कोणत्याही गोष्टी नसतानाही आपल्यात असलेल्या अभिनयाच्या कलेनं आणि व्यक्तीमत्वामुळं रसिकांच्या घरात स्थान मिळवणारे मोजके कलाकार  सिनेसृष्टीत आहेत. त्यापैकी आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेता सुमेध मुद्गलकरचा.अभिनय सामर्थ्यामुळं त्यांने रसिकांच्या मनं जिंकली आहेत.'मांजा','व्हेंटिलेटर'अशा चित्रपटातून आणि 'डान्स महाराष्ट्र डान्स' त्यानंतर 'डान्स इंडिया डान्स सिझन ४', 'दिल दोस्ती डान्स''अशोका सम्राट' या हिंदी मालिकेतून आपल्या अभिनयानं सा-यांना प्रभावित करणा-या सुमेधचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय.बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.  सुमेध मुद्गलकर 'बकेट लिस्ट'सिनेमाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.गेले काही दिवस सुमेधचे फॅन्स त्यावर भलतेच फिदा झाले आहेत त्याचं कारण म्हणजे नुकतंच सुमेधने जिम मध्ये कसरत करत असतानाचे फोटो सोशल साईट वर शेअर केले आहेत.त्याचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा फोटो पाहून मधला चाहते त्यावर भलतेच फिदा झाले आहेत.सुमेधचं हे हॉट डुड ट्रान्सफॉर्मेशन युवकांमध्ये फारच  प्रेरणादायी ठरत आहेत.नवीन वर्षात सुमेधचं हे एक प्रकारे फिटनेस रेसोल्युशन प्रेक्षकांना नक्कीच आवडलं असणार.सूरज बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनच्या 'हम आपके है कौन'या सिनेमातून सख्ख्या बहिणी साकारणा-या माधुरी आणि रेणुका एका मराठी सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर तब्बल 23 वर्षांनी एकत्र येत आहेत.विशेष म्हणजे हा सिनेमा धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा पहिलावहिला मराठी सिनेमा असणार आहे.खुद्द ट्विटरवर रेणुकाने याबाबतची पोस्ट केली आहे. तेजस विजय देवस्कर या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. एका लघुपटाच्या निमित्ताने तेजसने रेणुका यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्या लघुपटामध्ये रेणुका यांनी काम केलं नव्हतं. मात्र तेजसशी त्या संपर्कात होत्या.एके दिवशी तेजस हा रेणुका शहाणे यांना भेटण्यासाठी आला.त्यावेळी एका मराठी सिनेमाचा उल्लेख केला.त्याने सांगितले की माधुरी दीक्षित या सिनेमात काम करत आहे.माधुरीचे नाव ऐकताच त्या क्षणी मी सुद्धा या सिनेमात काम करण्यास होकार दिल्याचे रेणुका शहाणे यांनी सांगितले.पुन्हा एकदा माधुरीसह काम करण्यासाठी एक्साईटेड असल्याचे सांगत असताना रेणुका शहाणे यांनी 'हम आपके है कौन' सिनेमाच्या वेळच्या आठवणींनाही उजाळा दिला.दोघीही मराठी कुटुंबातून असल्याने त्यावेळी विशेष नातं निर्माण झाली होती.तसंच माधुरी दीक्षित एवढी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होती तरीही तिच्या वागण्या बोलण्यात कुठलाही बडेजावपणा नव्हता.तिचे पाय जमिनीवरच होते असंही रेणुका शहाणेनी आवर्जून सांगितले.'हम आपके है कौन' या सिनेमानंतर पुन्हा एकदा कधी काम करणार याची प्रतीक्षा होती आणि अखेर तो क्षण सिनेमाच्या निमित्ताने जुळून आला अशी प्रतिक्रियाही रेणुका शहाणे यांनी दिली आहे.