Join us

सुमित राघवनला पटलं नाही आमिर खानचं 'शिंदे' आडनावाला 'शिंडे' बोलणं, ट्विट करत व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 4:15 PM

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसाठी मराठी भाषा नवीन नाही. आमिरला मराठी भाषेचे चांगले ज्ञान आहे. काही वर्षापासून त्यानेही मराठी भाषेचे धडे गिरवले आहेत.आमिरलाही ही चूक कळु नये याही गोष्टीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेणाऱ्यांमध्ये सगळ्यात वरचं नाव म्हणजे अभिनेता आमीर खान. भूमिकेला न्याय देण्यासाठी आमीर काहीही प्रयोग करायला तयार असतो. त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं. आमीरच्या या कामाप्रती असलेली निष्ठा यामुळेच लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीत आमिर खानचे नाव आघाडीवर असते.

सध्या आमिर खानची एक जाहिरात टीव्हीवर झळकत आहे. या जाहीरातीत आमिर खान 'शिंदे' आडनावाचा उच्चार 'शिंडे' असे करतो. हीच बाब अभिनेता सुमित राघवनने निदर्शनास आणून दिली आहे. मुळात अशाप्रकारे मराठी आडनावाचा चुकीचा उच्चार करणे म्हणजेच मराठी आडनावांची गळचेपी होत असल्याचे सुमित राघवनचे म्हणणे आहे. सुमित राघवन सोशल मीडियावर विविध मुद्द्यावर आपले रोख ठोक मतं मांडत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडत असतो. त्यामुळे आमिर खानच्या जाहीरातीकडे बारकाईने कोणी बघितले नसले तरी सुमित राघवने मात्र हीच गोष्ट प्रकाशझोतात आणली आहे.

विशेष म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसाठी मराठी भाषा नवीन नाही. आमिरला मराठी भाषेचे चांगले ज्ञान आहे. काही वर्षापासून त्यानेही मराठी भाषेचे धडे गिरवले आहेत. आमिरलाही ही चूक कळु नये याही गोष्टीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मराठी बोलता यावं यासाठी आमिरनेही तितकीच मेहनत घेतली होती. त्यामुळे आमिर खानलाच ही गोष्ट लक्षात यायला हवी होती.

कौतुकास्पद! आमिर खानच्या 'पानी फाउंडेशन'ने नापीक जमिनीवर उगवले जंगल; शेअर केला व्हिडीओ

तसेच गेल्या काही वर्षांत आमिर खानने आपल्या 'पानी फाउंडेशन'च्या माध्यमातून पाण्याच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावला आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशन प्रयत्न करत आहे. हे फाउंडेशन महाराष्ट्रातील गावांमध्ये जल संरक्षण आणि वाटरशेड बांधण्याच्या दिशेने कार्य करते.

सप्टेंबर २०१८ पासून सुरू झालेल्या 2 वर्षांच्या कालावधीत, महान जपानी पारिस्थितिकीविद अकीरा मियावाकी यांच्यापासून प्रेरित- सायट्रीस पर्यावरण ट्रस्टसोबत एकत्र येऊन 'पानी फाउंडेशन'ने आपल्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रवासाची सुरुवात केली, ज्यामध्ये एका पडीक जमिनीचे जंगलात रूपांतर केले. दोन वर्षानंतर, सप्टेंबर २०२० मध्ये या परियोजनेला यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :आमिर खानसुमीत राघवन