नाटक, चित्रपट, मालिका आणि जाहिरातींतून सतत नवनवीन भूमिकांत दिसणारा एक गोंडस पण रांगडा चेहेरा म्हणजेच सुप्रित निकम. ''नकळत सारे घडले', 'सरस्वती' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये छोटया पण लक्षवेधी कॅरॅक्टर्स निभावणारा सुप्रित केवळ नाटक आणि मालिकांपर्यंतच मर्यादित राहिला नाही तर त्याने 'विठ्ठला शप्पथ' या मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. पिळदार शरीरयष्टी आणि समोरच्यावर छाप सोडणारं व्यक्तिमत्त्वामुळे सुप्रित सध्या तरुणींच्या गळ्यातलाताईत बनला आहे. सतत नावीन्याच्या शोधात असणाऱ्या सुप्रितकडे आगामी काळात खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत.
मूळचा सांगलीचा असणारा सुप्रित जवळपास १२ वर्ष नाटकांत काम करत होता. सध्या सुप्रितचे आगामी मराठी चित्रपट 'बोनस,' 'कटिबंध', 'ईमेल-फिमेल' प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सुप्रितने 'बोनस' मध्ये केळ्या नावाची मजेशीर भूमिका केली आहे तर 'कटिबंध' मध्ये संत नरहरी सोनार यांच्या मोठ्या मुलाची मालूची भूमिका साकारलीये. विशेष सांगायचं म्हणजे सुप्रितच्या वाट्याला तशा खलनायकी भूमिकाच जास्त आल्या . 'विठ्ठला तूच' या आगामी चित्रपटातही मुख्य खलनायकाच्या भूमिकेत सुप्रित आपल्याला दिसणार आहे. 'विठ्ठला तूच' मधील खलनायक हा अतिशय रोमांचक असून लवकरच एका कन्नड चित्रपटामध्येही सुप्रितची वर्णी लागलीये. H2O मधील खलनायक म्हणजे एक धमाल आहे. 'H2O कहाणी थेंबाची'मध्ये ऍक्शन आहे ड्मा आहे आणि मुख्य म्हणजे एक लव्हस्टोरीसुद्धा रसिक-प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
पर्यावरणचा ढासळता समतोल अनेक संकटांना आमंत्रित करीत आहे. विकासाच्या हव्यासापायी केलेली अमानवी प्रगती भविष्यकाळात भीषण वास्तव घेऊन आपल्यासमोर उभं राहणार आहे. अशाच एक गंभीर विषयावर भाष्य करणारा मौलिक मराठी चित्रपट म्हणजे जी. एस. प्रोडक्शन प्रस्तुत सुनील झवर निर्मित आणि मिलिंद पाटील दिग्दर्शित 'H2O कहाणी थेंबाची' १२ एप्रिलपासून आपल्या भेटीस येणार आहे तोपर्यंत सध्या युट्युब लोकप्रिय होत असलेल्या 'H2O कहाणी थेंबाची' चित्रपटातील गाणी तुम्ही सोशल चॅनेल्सवर गाणी नक्की पाहू शकता.
मराठी मनोरंजनक्षेत्रातला उभारता तारा सुप्रित निकमचा खलनायकी अंदाजातला प्रेमळ प्रियकर पाण्यासाठी १२ एप्रिलपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांत नक्की पहा 'H2O कहाणी थेंबाची'.