Join us

'आम्हाला मुलगा हवा होता', श्रियानंतर सुप्रिया पिळगावकरांचं झालंय दोन वेळा मिसकॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 2:48 PM

सचिन पिळगांवकर अर्भक घेऊन शिवाजी पार्क स्मशानभूमीत जात होते तेव्हा...

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) ही मराठीतील एव्हरग्रीन आणि सुपरहिट जोडी.'नवरी मिळे नवऱ्याला', 'अशी ही बनवा बनवी','नवरा माझा नवसाचा', 'आम्ही सातपुते', 'आयत्या घरात घरोबा' असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांना श्रिया ही एकुलती एक मुलगी आहे. त्यांनी श्रियाला दत्तक घेतलं होतं. नंतर सुप्रिया यांना मुलगा हवा होता. मात्र त्यांचा दोन वेळा गर्भपात झाला. सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या 'हाच माझा मार्ग' या पुस्तकात याबद्दल लिहिलं आहे.

श्रिया नंतरच्या दोन मुलांविषयीची आठवण सांगताना सचिन पिळगांवकर लिहितात की, "सुप्रियाला मुलगा हवा होता. तिने माझं आणि माझ्या आईमधलं प्रेम पाहिलं होतं. त्यामुळे आपल्यालाही मुलगा हवा  अशी त्यांची इच्छा होती. 1992 साली सुप्रिया गरोदर राहिली. तेव्हा मी एका प्रोजेक्टसाठी बाहेर होतो. सुप्रिया 5 महिन्यांची गरोदर असताना तिचा गर्भपात झाला. यानंतर पुन्हा 1996 साली ती गरोदर राहिली. पण याहीवेळी पाचव्या महिन्यातच आम्ही मूल गमावलं. ते अर्भक घेऊन मी शिवाजी पार्क स्मशानभूमीत जात येतो. सुप्रियाच्या वेदना मला जाणवत होत्या. मी त्याच विचारात होतो. हे आमच्यासोबतच का होतंय असे विचार मनात येत होते. मी खूप भावूक झालो होतो. पण नियतीपुढे काय चालणार? मग मीच मुलाचा विचार कायमचा डोक्यातून काढून टाकला. नंतर अली असगर (Ali Asgar) आणि स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) दोघंही आमच्या आयुष्यात आले आणि आपलंसं करुन गेले."

सचिन- सुप्रिया अली असगर आणि स्वप्नील जोशीला आपली मुलंच मानतात. याविषयी बोलताना सचिन पिळगांवकर म्हणतात, "अली असगरने 'एक दोन तीन'मध्ये विनोदी भूमिकेत काम केलं. तर 'हद कर दी' मध्ये स्वप्नील जोशी आला. हे दोघंही आमच्या आयुष्यात आले आणि आम्ही त्यांना मुलं मानायला गेलो. श्रियासोबतही दोघांचं नातं अतिशय घट्ट आहे. अली आईवर गेला आहे तर स्वप्नील माझ्यावर. आमच्या या तीनही मुलांच्या नावाने मी 'थ्री चीअर्स' ही निर्मिती संस्थाही सुरु केली."

टॅग्स :सचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकरश्रिया पिळगावकरपरिवारमराठी अभिनेता