सुशांत शेलार पुन्हा रंगभूमीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2017 5:34 AM
मनोरंजनाच्या दुनियेतल्या विविध माध्यमांतून लीलया वावरणारा अभिनेता सुशांत शेलार ६ वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आचार्य प्र.के.अत्रे ...
मनोरंजनाच्या दुनियेतल्या विविध माध्यमांतून लीलया वावरणारा अभिनेता सुशांत शेलार ६ वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आचार्य प्र.के.अत्रे लिखित ‘एक’ च प्याला’ या विडंबन नाटकातून तो मुख्य भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहे.आचार्य प्र.के.अत्रे लिखित व सतीश पुळेकर दिग्दर्शित ‘एक’ च प्याला’ या नाटकाचा शुभारंभ शुक्रवार ९ जून रोजी बालगंधर्व पुणे येथे होणार आहे. सध्या या नाटकाच्या जोरदार तालमी सुरु आहेत. एका मोठ्या कालावधी नंतर रंगभूमीवर परतणारा सुशांत या नाटकात काम करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं असल्याचं सांगतो. सतीश पुळेकर यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी नामी संधी असल्याचा उल्लेखही तो आवर्जून करतो.पुण्याचे प्रयोग झाल्यांनतर बुधवार १४ जूनपासून या नाटकाचे मुंबई व महाराष्ट्रात नियमित प्रयोग सुरु राहणार आहेत.या नाटकात सुशांत शेलार यांच्यासोबत पल्लवी वैद्य, स्वप्नील राजशेखर, अमोल बावडेकर, विनायक भावे, मृणालिनी जावळे, हेमंत भालेकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकाची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं आहे. संगीत ज्ञानेश्वर पेंढारकर व पार्श्वसंगीत नंदलाल रेळे यांचं आहे. वेशभूषा महेश शेरला यांची आहे. नाटकाचे निर्माते प्रफुल्ल मोरे असून निर्मिती सूत्रधार हृदयनाथ राणे आहेत.