Join us

"हिंदू, मुस्लीम, शोषित आणि शोषण करणाऱ्या सर्व जातीमधील...", सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 2:08 PM

"काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून मणिपूरपर्यंत प्रत्येक राज्यातील...", सुव्रत जोशीची पोस्ट चर्चेत

मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुव्रतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नव्या प्रोजेक्टबाबत सुव्रत चाहत्यांना पोस्टमधून माहिती देत असतो. सध्या सुव्रतने केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा रंगली आहे. नुकताच फ्रेंडशिप डे साजरा केला गेला. यानिमित्ताने सुव्रतने केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. 

सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये "आयुष्याने आतापर्यंत काय दिलं आहे? तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून मणिपूरपर्यंत प्रत्येक राज्यातील एक हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, जैन आणि बुद्ध धर्मातील, शोषित आणि शोषण करणाऱ्या सर्व जातीमधील, याची जाण असलेले आणि नसलेले स्त्री, पुरुष आणि यापेक्षा वेगळी लिंग ओळख सांगणारे, समलिंगी, डावे, मार्क्सवादी, उजवे, मोदीप्रेमी, राजकारणात अजिबात रस नसणारे, सम्यक, आंबेडकरवादी, NRI, परदेशी, सहा वर्षांपासून ते साठी वर्षांचे...असे ढीगभर मित्र! मैत्रीतून माणूस जसा आणि जेवढा कळतो तसा प्रणयातूनदेखील समजत नाही! हॅप्पी फ्रेंडशिप डे," असं म्हटलं आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मराठी अभिनेत्रीला आकारला गेला तिपट्ट टोल, नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली...

क्रांती रेडकर नाही तर समीर वानखेडेंना आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री, खुलासा करत म्हणाले...

सुव्रतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. मोजक्या शब्दात व्यापक अर्थ असलेली त्याची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, सुव्रतने 'गोष्ट एका पैठणीची', 'शिकारी', 'मन फकीरा' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २०१९ साली सुव्रतने अभिनेत्री सखी गोखलेशी विवाह करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. 

टॅग्स :सुव्रत जोशीमराठी अभिनेता