सुव्रतला आवडते सामाजिक चित्रपटात काम करायला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 1:34 PM
अभिनेता सुव्रत जोशी नाटक, मालिका आणि आता एका आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यास सज्ज झाला आहे. कलाकार जसे ...
अभिनेता सुव्रत जोशी नाटक, मालिका आणि आता एका आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यास सज्ज झाला आहे. कलाकार जसे नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तत्पर असतात, तसेच ते सामाजिक भान देखील जपत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. अनेकजण या कलाकारांना स्वत:चे आदर्श मानतात. मग जर एखादया कलाकाराने महत्वाच्या विषयावर जनजागृती केली तर नक्कीच ती लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होते. त्यामुळेच सुव्रतने एड्सविषयी स्वत:चे मत मांडले आहे. तो सांगतो, एड्स या विषयावरील चित्रपट, नाटक नक्कीच आताच्या काळात स्वीकारले जातील असं मला वाटतं. हा विषय स्वीकारला जावो अथवा न जावो पण यावरच जो टॅबो आहे तो जाणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण एड्स झालेल्या व्यक्तीला अत्यन्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:हून येऊन डॉक्टरला सांगून त्यावर योग्य तो उपचार घेणं, आणि उपचार सुरु असताना त्याच्या घरच्यांचा आणि मित्रमंडळींचा पाठिंबा मिळणं गरजेचं आहे. हे सर्व मला ठाऊक असण्याचे कारण म्हणजे मी स्वत: धूसर नावाच्या एका डॉक्यु-फिक्शन चित्रपटात काम केलं होत. हा चित्रपट अनेक वर्षांपूर्वी प्रयास नावाची पुण्यात संस्था आहे जी एड्स या विषयावरच काम करते, लोकांना मदत करते. त्यांच्या कुटुंबियांच्या किंवा इतर समाजातील लोकांना त्यांनी स्वत:चा टॅबू घालवावा आणि एड्स झालेल्या व्यक्तीकडे कशा पद्धतीने बघावं तसेच एड्स झालेल्या व्यक्तीने स्वत:कडे कस बघावं या विषयावरच हा चित्रपट आधारित होता. त्यावेळी त्यात काम करणाºया नटांची कार्यशाळाही मी घेतली होती. मला असं वाटतं की, सामाजिक विषयावर चित्रपट करताना तो कुठेही प्रचारकी होता काम नये.