अभिनेता सुयश टिळकने आयुशी भावेसोबत साखरपुडा झाल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. या खास क्षणाचे फोटो शेअर करत सुयशने चाहत्यांनाही सुखद धक्काच दिला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. सुयश आणि आयुशी दोघांनीही हे फोटो इन्स्टाग्रामवर आपले मित्र-मैत्रिणी तसंच फॅन्ससह शेअर केले आहेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु आहे. साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नव्हते.
त्यामुळे लग्न कधी करणार यावरच चाहत्यांचे लक्ष लागले आहे. यावर खुद्द सुयशने त्याच्या लग्नाचा मुहुर्ताविषयी सांगितले आहे. दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वर्षअखेरीस लग्न करणार असल्याचे सांगितले होते. करोनामुळे अनेक निर्बंध आहेत. सगळंकाही सुरळीत होण्याची वाट पाहतोय, लग्नाचा मुहूर्त अजुन ठरला नाहीय. तरीही याचवर्षी डिसेंबरपर्यंत आम्ही लग्न करायचं, असं ठरवल्याचे सुयशने चाहत्यांना सांगितले आहे.
आयुशी भावेसुद्धा सुयशप्रमाणेच अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. अभिनेत्री आणि डान्सर म्हणून तिची ओळख आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुशी झळकली होती. आयुशी लवकरच या गावाचं की त्या गावाचं सिनेमात झळकणार आहे.आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.