Join us

सुयश टिळकला झाली होती कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

By तेजल गावडे | Updated: November 6, 2020 13:21 IST

अभिनेता सुयश टिळक आता कोरोनामुक्त झाला असून त्याने पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचे संकट अद्याप आहे. बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता अभिनेता सुयश टिळकलाही कोरोनाची लागण होती. ही माहिती खुद्द त्यानेच इंस्टाग्रामवर दिली आहे. आता तो कोरोनामुक्त झाला असून त्याने पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सुयश टिळकने इंस्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, मी बरा आहे. तुम्ही स्वतःची आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या. तसेच या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, नमस्कार. मी आता व्यवस्थित आहे. पण गेल्या महिन्यात मला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. लक्षणे दिसत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, २० दिवस उपचार घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून मी आता बरा झालेलो आहे व पुन्हा काम सुरू केले आहे. 

सुयशने पुढे म्हटले की, दिवाळी लवकरच येत आहे तर कृपया काळजी घ्या. रस्त्यावर थुंकू नका त्याने हा विषाणू पसरू शकतो. ताप, घसा दुखणं, वास न येणे, चव न कळणे, अंगदुखी, असाधारण थकवा असे काही लक्षण दिसले तर न लपवता डॉक्टरांचा सल्ला घ्या व चाचणी करून घ्या. तुम्हाला काही होत नसेल तरी तुम्ही विषाणू पसरवू शकता. काळजी घ्या. प्रेम पसरवा, व्हायरस नाही. 

सुयश टिळकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो शेवटचा खाली पीली चित्रपटात झळकला आहे. या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे व ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होते.

तसेच तो सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतो आहे.  

टॅग्स :सुयश टिळककोरोना वायरस बातम्या