आपल्या अभिनयाने हिंदी तसेच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वप्नील जोशीने लेटफ्लिक्स मराठी सोबतच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. निर्माता-उद्योजक नरेंद्र फिरोदिया व इंडिया नेटवर्कचे संस्थापक राहूल नार्वेकर या दोघांनी मिळून 'लेटफ्लिक्स' हे नवे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केले. लेट्सफ्लिक्स मराठी' मुळे नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे.
लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगलासह इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रम, वेब सीरिज, शॉर्टफ्लिम्स, डॉक्युमेंट्रीज व ओरिजनल मराठी सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. 'लेट्सफ्लिक्स' च्या घोषणेपासून ते मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.
गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून स्वप्नील जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या व्हिडिओमध्ये त्याने 'लेटफ्लिक्स' सोबतच्या त्याच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. हा उपक्रम काय असेल, कशाशी निगडित असेल हे मात्र त्याने गुलदस्त्यातच ठेवले. त्याच्या ह्या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.स्वप्नील जोशीचा हा नवा उपक्रम सिनेमा असेल का किंवा एकदा कार्यक्रम किंवा वेब सीरिज? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या १ मेला मिळणार आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये, दर्जेदार आशय निर्माण झाल्याने मराठी मनोरंजन क्षेत्र प्रगतीपथावर पोचले आहे. अशातच 'लेट्सफ्लिक्स मराठी' च्या येण्याने नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. यात ओरिजनल मराठी चित्रपट, वेबसिरीज, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंटरीस्, इत्यादी दाखविले जातील. लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगला त्याचप्रमाणे इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.