Join us

"वर्ष संपताना अत्यंत जबाबदारीने सांगतो की..." स्वप्नील जोशीनं शेअर केली खास पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:21 IST

वर्ष संपताना स्वप्नील जोशीनं खास पोस्ट शेअर केली आहे. 

२०२४ हे वर्ष सरत चाललं आहे आणि २०२५ अवघ्या दोन दिवसांत दार ठोठावेल. नवीन वर्षाची सुरुवात होणार म्हटलं की लगेचच आपण मागच्या वर्षीचा आढावा घ्यायला बसतो. २०२४ वर्षाला निरोप (Year Ender २०२४) देताना अनेक कलाकारांनी हे वर्ष खास केलं. मराठी चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याच्यासाठी २०२४ हे वर्ष अनेक गोष्टींसाठी खास ठरलं. आता वर्ष संपताना स्वप्नील जोशीनं खास पोस्ट शेअर केली आहे. 

स्वप्नील जोशी यानं इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यानं कॅप्शमध्ये लिहलं, "वर्ष संपताना अत्यंत जबाबदारीने सांगतो की...  २०२४…..२०२५…..२०…anything! डोक्यावर छत आहे, खायला भाकर आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, बायको मुलं आहेत, आणि देवाची आठवण आहे…तर सगळं ठीक आहे!". स्वप्नीलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्यात. 

स्वप्नील जोशीनं या वर्षात वैविध्यपूर्ण आणि लक्षवेध भूमिका साकराल्याच, निर्मिती क्षेत्रातही हात आजमावला. स्वप्नीलने निर्माता म्हणून २०२४ वर्षात 'नाच गं घुमा' चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लही झाला. व्यावसायिक प्रगती शिवाय खाजगी आयुष्यातही स्वप्नील जोशीसाठी वर्ष सुखाचं ठरलं. स्वप्नील याने लाख मोलाचा पल्ला गाठणारी गोष्ट त्याने या वर्षात केली. स्वप्नीलने नवी रेंज रोव्हर डिफेंडर घेतली.  मार्केट व्हॅल्यूनुसार गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे. वर्षाच्या अखेरीस स्वप्नील जोशीने गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. आता आगामी नवीन वर्षात स्वप्नील अजून काय काय नव्या प्रोजेक्टचा भाग होणार आहे हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीइयर एंडर 2024