Join us

समांतर वेबसिरीज मराठीसह या भाषांमध्येही होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 4:55 PM

स्वप्नील जोशी समांतरच्या निमित्ताने वेब दुनियेत पदार्पण करत आहे.

आपल नशीब आपण घडवत असतो या गोष्टीवर अनेकांचा विश्वास असतो मात्र, खरंच आपण आपलं नशीब जगतोय का? जे नशीब घेऊन आपण जन्माला आलो आहोत ते आपण जगत आहोत का? हा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहत नाही! कोणीतरी जगलेलं आयुष्य जर तुमचे भविष्य ठरणार असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीमुळे तुमचं भविष्य जाणून घेता येईल ना! याच आशयाला अनुसरून एक चित्तथरारक कथा 'समांतर', या वेबसिरीज च्या रूपाने उलगडणार आहे.

 कुमार महाजन या सामान्य माणसाचा आयुष्याचा रोमांचकारी प्रवास. कुमार महाजनचा या सामान्य माणसाचं आयुष्य बदलत ज्यावेळी त्याला समजत सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीचा भूतकाळ हा त्याचा भविष्यकाळ ठरणार आहे. 'कुमार महाजन' साकारत असलेला स्वप्नील जोशी समांतरच्या निमित्ताने वेब दुनियेत पदार्पण करत आहे. या वेबसिरीज मध्ये स्वप्नील जोशी सामान्य माणसाचे धकाधकीचे जीवन जगताना दिसणार आहे, कुटुंबाच्या दैनंदिन गरज भागवत भागवत नाकी नऊ येत असताना कुमारला नोकरीवरून काढले जाते. तेजस्विनी पंडित ही गुणी अभिनेत्री स्वप्नील जोशींच्या पत्नीची भूमिका साकारत असून ९ भागांची ही वेबसिरीज सतिश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे.

ही समांतरची कथा ही बहुसंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहचावी तसेच तिला भाषेचे बंधन नसावं म्हणून ही वेबसिरीज मराठी सोबतच हिंद, तामिळ आणि तेलगू या भाषेत सुद्धा प्रदर्शित होणार आहे. मराठी सोबत इतर ३ भाषेत 'समांतर' एकाचवेळी १३ मार्च रोजी  प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजविषयी दिग्दर्शक सतिश राजवाडे सांगतात "मराठी साहित्य आणि कलाकृतींना अजून एक माध्यम मिळालं आहे आणि ते म्हणजे वेब, सुहास शिरवळकरांची ही कथा साकारताना मला फार आनंद होतोय. ही कथा वेबसिरीजच्या निमित्ताने तसेच स्वप्नील आणि तेजस्विनीमुळे एका वेगळ्या उंचीवर जाईल हे नक्कीच."

कुमार महाजन साकारत असलेला स्वप्नील त्याच्या भूमिकेविषयी सांगतो," माझा विश्वास हा नेहमीच कठोर परिश्रमांवर आहे, मात्र नशिबाचा विचार करणारे, ग्रह तारे सरळ आहेत का, हीच योग्य वेळ आहे का? असे प्रश्न पडणाऱ्यांविषयी मला नेहमीच कुतूहल राहिले आहे आणि त्यामुळेच मी 'समांतर' करण्याचा निर्णय घेतला".

तेजस्विनी पंडित 'समांतर' विषयी सांगते " समांतरसाठी मी खरंच फार उत्सुक आहे कारण ही पहिली मराठी वेबसिरीज आहे जी मराठी व्यतिरिक्त ३ इतर भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.वेब हे माध्यम आम्हा कलाकारांना एक चांगली संधी उपलब्ध करून देत ज्यात आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे. ही वेबसिरीज प्रत्येकाला शेवट पर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल.

टॅग्स :स्वप्निल जोशी