Exclusive : स्वप्नील जोशीचा लाडका लेक या माध्यमातून करणार सिनेइंडस्ट्रीत पदार्पण
By तेजल गावडे | Published: September 5, 2018 05:29 PM2018-09-05T17:29:07+5:302018-09-05T17:30:39+5:30
आता ज्युनियर स्वप्नील म्हणजेच त्याचा छोटा मुलगा राघव स्वप्नीलच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करतो आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता त्याचा मुलगा राघव देखील सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. हो, हे वाचून जरा गोंधळलात ना. त्याचा मुलगा राघव एका कमर्शियल जाहिरातीत झळकताना दिसणार आहे. त्यामुळे जाहिरात पाहताना एखादे छोटे बाळ स्वप्नील जोशीच्या मुलासारखे दिसते आहे म्हणून गोंधळून जाऊ नका. तो त्याच्याच मुलगा राघव आहे.
स्वप्निल आणि लीना १६ डिसेंबर २०११ ला विवाहबंधनात अडकले. त्यांना मायरा व राघव अशी दोन मुले आहेत. त्यातील मायराचा जन्म २३ मे २०१६ झाला व राघवचा जन्म गेल्यावर्षी ७ डिसेंबरला झाला. आता ज्युनियर स्वप्नील म्हणजेच त्याचा छोटा मुलगा राघव स्वप्नीलच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करतो आहे. तो जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या जाहिरातीत झळकणार आहे. ही जाहिरात ५ सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
स्वप्नीलने वयाच्या नवव्या वर्षी 'रामायण' या मालिकेत कुशची भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर कृष्ण या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारून स्वप्नील जोशी घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने अनेक हिंदी व मराठी मालिकेत काम केले. स्वप्नीलने हिंदी चित्रपट 'गुलाम-ए-मुस्तफा' व 'दिल विल प्यार व्यार'मध्ये काम केले. त्यानंतर त्याने स्वतःला पूर्णपणे मराठी चित्रपटसृष्टीत झोकून दिले. 'मुंबई-पुणे-मुंबई', 'दुनियादारी', 'मंगलाष्टक वन्स मोअर', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'मितवा', 'तु ही रे', 'मुंबई-पुणे-मुंबई २', 'लाल इश्क', 'भिकारी' व 'रणांगण' या मराठी चित्रपटातून त्याने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच स्वप्नीलने 'नकळत सारे घडले' मालिकेतून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच, तो मराठी सिनेमांचीही निर्मिती करणार आहे.