Join us

'वीर सावरकर' चित्रपट मराठीत येणार, 'हा' प्रसिद्ध मराठी अभिनेता बनला सावरकरांचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 7:02 PM

एक मराठमोळा अभिनेता सावरकरांचा आवाज झाला आहे. 

अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा लवकरच 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात रणदीपनं विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा हिंदीसह मराठीतही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या मराठी आवृतीसाठी एक मराठमोळा अभिनेता सावरकरांचा आवाज झाला आहे. 

नुकतेच 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता सुबोध भावेच्या आवाजात हा चित्रपट मराठी डब करण्यात आलाय. त्याचा आवाज हा सावरकरांच्या भूमिकेसाठी अतिशय चपखल ठरल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. सुबोध भावे हा इंडस्ट्रीतील सर्वात बुद्धिमान लोकांपैकी एक आहे. संवादात कसे चढउतार करायचे हे त्याला माहीत आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीप हुड्डा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असून त्यानेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अंकिता लोखंडेनेही या चित्रपटात वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. आधी महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली. 

टॅग्स :सुबोध भावे सेलिब्रिटीमराठी अभिनेताविनायक दामोदर सावरकर