रणदीप हूडाची प्रमुख भूमिका असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा रिलीज होऊन आठवडा उलटला आहे. आज २९ मार्चला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीत रिलीज होत आहे. त्यामुळे मराठी रसिकप्रेक्षकांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीत रिलीज होत असताना एक खास गोष्ट समोर येतोय. एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने रणदीप हूडाने साकारलेल्या सावरकरांना आवाज दिलाय. हा अभिनेता म्हणजे सुबोध भावे.
सुबोध भावेने यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. सुबोध लिहीतो, "आजपासून सर्वत्र सावरकर हा चित्रपट मराठी मध्ये प्रदर्शित होत आहे. आदरणीय सुधीर फडके यांची निर्मिती असलेल्या "वीर सावरकर " या चित्रपटात मी एका ब्रिटिश पोलिस ऑफिसरची छोटीशी भुमिका केली होती. आणि आज रणदीप हुडा अभिनीत "सावरकर " या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या सावरकरांच्या भूमिकेला मराठी मध्ये आवाज देण्याची संधी मला मिळाली."