Join us

स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:08 IST

तिसरा भाग येऊन आता ६ वर्ष झाली आहेत.

मराठीतील सुपरहिट सिनेमा 'मुंबई पुणे मुंबई' (Mumbai Pune Mumbai 4) चा चौथा भाग कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेच्या या सिनेमाची जादू आजही कायम आहे. सिनेमाचे तीनही भाग खूप गाजले. आता चौथ्या भागाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान स्वप्नील जोशीने (Swwapnil Joshi) सोशल मीडियावरुन नुकतंच 'मुंबई पुणे मुंबई ४'ची हिंट दिली आहे. 

 २०१० साली 'मुंबई पुणे मुंबई' आला होता. पाच वर्षांनी म्हणजेच २०१५ साली दुसरा भाग आला. आणि नंतर तीन वर्षांनी २०१८ साली तिसरा भाग आला. पहिल्या भागात गौरी आणि गौतम एकमेकांना भेटतात. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न  होतं. तर तिसऱ्या भागात ते आईबाबा होतात असं टप्प्याटप्प्याने गोष्ट दाखवली आहे. आता दोघांचं आई बाबा म्हणून आयुष्य कसं आहे हे चौथ्या भागात बघण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. याविषयी स्वप्नील जोशीला सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने मुक्ता बर्वे, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना टॅग करत लिहिले, 'जे लोक MPM4 बद्दल विचारत आहेत, नेव्हर से नेव्हर!'

स्वप्नीलच्या या पोस्टने मुंबई पुणे मुंबईचा चौथा भाग नक्कीच येणार अशी हिंटच मिळाली आहे. मात्र तो कधी येणार, याचं शूट कधी सुरु होणार याबाबत अद्याप काहीच कल्पना नाही. तिसरा भाग येऊन आता ६ वर्ष झाली आहेत. चौथ्या भागासाठी चाहत्यांना आणखी किती वाट पाहावी लागणार हे कळेलच.

टॅग्स :स्वप्निल जोशीमुक्ता बर्वेमुंबई पुणे मुंबई 3मराठी अभिनेतामराठी चित्रपट