अजय देवगण- काजोल आणि सैफ अली खान स्टारर तान्हाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमा चांगला सुपरहिट ठरला होता. या अभिनेत्यांच्या भूमिकासोबतच इतर कलाकारांच्याही भूमिका चांगल्याच लक्षवेघी ठरल्या. देवदत्त नागे, अजिंक्य देव, शशांक शेंडे, शरद केळकर यांनीदेखील सिनेमात महत्त्वाची पात्रं साकारली साकारत रसिकांची वाहवा मिळवली. या सर्व प्रसिद्ध कलाकारांसोबत अजून एक मराठी कलाकार सिनेमात झळकला होता चुलत्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता होता कैलास वाघमारे.
‘चुलत्या’ ही भूमिका छोटी असली तरी कैलास वाघमारेने ती चोख निभावली होती. या सिनेमा आधी शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकात त्याने कट्टर मावळ्याची भूमिका निभावली होती. मुळचा जालना जिल्ह्यातला कैलास असून शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झालाय. अभिनयाची आवड त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती.अखेर त्याला संधी मिळाली आणि त्यातून स्वतःला सिद्ध करुन दाखवले.
'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलास वाघमारे या सिनेमात झळकल्यानंतर चांगलाच लोकप्रिय झाला. त्याला या भूमिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.
चुलत्याच्या भूमिकेमुळे कैलासचे प्रचंड कौतुक झाले. त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्गही निर्माण झाला.अभिनेता कैलाश लीला वाघमारे उत्तम अभिनेता असण्यासोबतच गायक एक चांगला लेखकही आहे. त्याच्या कथा-कविता प्रकाशित झाल्या आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का कैलाश वाघमारेप्रमाणेच त्याची पत्नीसुद्धा अभिनेत्री आहे. मीनाक्षी राठोड असे तिचे नाव आहे. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत मीनाक्षीने पंचबाईंची भूमिका साकारली आहे.मालिकाच नाहीतर सिनेमातही ती झळकली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ सिनेमातही ती झळकली आहे.
मीनाक्षीने आणि कैलास दोघांनीही एकत्र काही नाटकातही काम केले आहे. मीनाक्षीसुद्धा मुळची जालन्याचीच आहे.कैलास आणि मीनाक्षी दोघांनीही मुंबईत आल्यानंतर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये सहभाग घेतला होता. तिथून त्यांना संधी मिळायला सुरुवात झाली आणि आज दोघांनीही इंडस्ट्रीत आपल्या अदाकारीने रसिकांची पसंती मिळवली आहे.