Join us

टीनएजर्सच्या मनाचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 11:00 IST

आकर्षणाला प्रेम समजण्याचे वय म्हणजे आजच्या भाषेत टीनएजर्स. या वयातले प्रश्न, शंका नवे जाणून घेण्याची इच्छा असलेला हा वयोगट ...

आकर्षणाला प्रेम समजण्याचे वय म्हणजे आजच्या भाषेत टीनएजर्स. या वयातले प्रश्न, शंका नवे जाणून घेण्याची इच्छा असलेला हा वयोगट खूप महत्त्वाचा. अलीकडच्या मराठी सिनेमामध्ये याच वयोगटाच भावविश्व पाहायला मिळत आहे. रेड बेरी एन्टरटेंन्मेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स निर्मित कौल मनाचा या चित्रपटाची कथासुद्धा लहान मुलांच्या कल्पनाविष्कारा भोवती गुंफण्यात आली आहे. २१  ऑक्टोबरला कौल मनाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेकदा चित्रपटातल्या गोष्टींचे अनुकरण करणाऱ्यांमध्ये मोठी संख्या याच वयोगटातील असते. कौल मनाचा मध्ये सिनेमाच्या प्रेमात पडलेल्या राज कुंडल या मुलाची कथा मांडली आहे. कौल मनाचा चित्रपटाची कथा लहान मुलांच्या भावना, विचारप्रणाली, कल्पनाशक्ती याविषयांवर आधारित आहे.  या वयातल्या मुलांसोबत सगळ्याच समस्यांबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजे याची जाणीव करून देणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन भिमराव मुडे यांच आहे. राजेश पाटील,विठ्ठल रूपनवर आणि नरशी वासानी निर्मित कौल मनाचा या सिनेमात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एका वेगळ्या विषयावरील असल्याने तो तरुणच नाही तर पालकांना देखील नक्कीच आवडू शकतो. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम काम केले आहे. या टिनएजर्सची फिल्मी कथा मोठ्या पडद्यावर पाहायची असेल तर थोडी वाट बघावी लागणार आहे. २१आॉक्टोबरला कौल मनाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.