सुबोध भावे (Subodh Bhave) आणि तेजश्री प्रधानचा (Tejashri Pradhan) 'हॅशटॅग तदेव लग्नम्' सिनेमा नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. लग्न ठरलत नसलेल्या, उशिरा ठरलेल्यांवर हा सिनेमा आधारित आहे. थोडा विनोदी पण काही ना काही संदेश देणारा असा हा सिनेम आहे. पुणे मुंबईत सिनेमा हाऊसफुल आहे मात्र सिनेमाला अगदीच कमी थिएटर्स मिळाली आहेत. तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
तेजश्री प्रधानने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने सिनेमा हाऊसफुल असलेले स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यानंतर आणखी एका स्टोरीमध्ये तिने लिहिले, 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा आमचा सिनेमा. पुणे-मुंबईमध्ये हाऊसफुल सुरु आहे.(मिळालेल्या मोजक्या सिनेमागृहांमध्ये) पण महाराष्ट्रात मराठी सिनेमासाठी 'थिएटर्स' उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे."
सुबोध आणि तेजश्रीचा हा सिनेमा २० डिसेंबर रोजीच प्रदर्शित झाला आहे. मात्र अगदी मोजक्या ३-४ थिएटर्समध्येच या सिनेमाला स्क्रीन मिळाली आहे. सुबोधनेही तेजश्रीची स्टोरी रिपोस्ट केली आहे.
हॅशटॅग तदेव लग्नम' चित्रपटात प्रेक्षकांना आजच्या तरुणाईचे लग्नाबाबतचे विचार दाखवण्यात आले आहे. ज्यात धमाल, मजामस्ती आहेच याव्यतिरिक्त यातील काही गोष्टी भावनिकरित्या गुंतुवून ठेवणाऱ्या आहेत. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका असून आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.