Join us

'शिरीन माझी भूमिका होती, पण सई ताम्हणकरचं…', 'दुनियादारी' चित्रपटाबद्दल तेजस्विनी पंडितने केला होता गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 6:34 PM

मराठी सिनेसृष्टीत गाजलेला दुनियादारी सिनेमात सई ताम्हणकरनं शिरीनची भूमिका साकारली होती. पण ही भूमिका मी करावी अशी ऑफर मिळाल्याचं तेजस्विनीनं म्हटलं होते. 

 मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं आपल्या अभियनानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने आतापर्यंत चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सिनेमे दिलेत. यात अगं बाई अरेच्चा, गाणं तुमचं आमचं. तू ही रे. पकडा पकडी, मुक्ती, सेव्हन रोशन व्हिला यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.  तेजस्विनी पंडित आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. काही महिन्यांपूर्वी तेजस्विनीने ‘दुनियादारी’ चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला होता.

अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी लेखक, दिग्दर्शक क्षेत्राकडे वळलेत. तेजस्विनी पंडित हीदेखील त्यापैकी एक. मालिका, वेबसिरीजमधून तिने हटके भूमिका साकारल्या आहेत. आता तेजस्विनी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. अथांग या गाजत असलेल्या वेबसिरिजच्या माध्यमातून तेजस्विनी पंडित निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. या वेबसिरिज प्रमोशनच्या निमित्ताने तिचा अभिनेत्री ते निर्माती असा प्रवास एका मुलाखतीत उलगडण्यात आला होता. 

सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये तेजस्विनीनं तिच्या करिअरबाबत अनेक खुलासे केलेत. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमानंतर मला तशाच धाटणीच्या भूमिका आल्यात मात्र त्या नाकारल्याचं तिने सांगितले. इतकेच नाही तर तेजस्विनीनं तिच्या करिअरमध्ये अशी भूमिका नाकारली आहे ज्यामुळे तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. ती भूमिका साकारली असती तर आज मी वेगळ्या ठिकाणी असते असं तेजस्विनीने सांगितले. मराठी सिनेसृष्टीत गाजलेला दुनियादारी सिनेमात सई ताम्हणकरनं शिरीनची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांच्या मनावर या सिनेमानं राज्य केले. या भूमिकेनंतर सई ताम्हणकर वेगळ्याच उंचीवर गेली. पण ही भूमिका मी करावी अशी ऑफर मिळाल्याचं तेजस्विनीनं म्हटलं होते. 

शिरीन भूमिका साकारण्यासाठी तेजस्विनी पंडितला संधी चालून आली होती. पण जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं तेच मिळतं. त्यामुळे ती भूमिका माझ्या नशिबात नव्हती असं तेजस्विनीने सांगितले. शिरीनची भूमिका मी साकारणार होते. माझे १६ डिसेंबरला लग्न होते. २० पासून शूट सुरू होणार होतं. संजयदादानं सांगितले मेहंदी काढू नको. मी लग्न असतानाही मेहंदी काढली नाही. पण दुसऱ्यादिवशी बाबांनी सकाळी दुनियादारी सिनेमासंदर्भात बातमी वाचली. त्यात माझं नाव नव्हतं. मी याबाबत फोन करून विचारलं पण कुणी नीट उत्तर दिले नाही. मला आजही या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही असा गौप्यस्फोट अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला होता. 

टॅग्स :तेजस्विनी पंडितसई ताम्हणकर