Join us

राजकारण ही कोविडपेक्षा भयाण, घातक ‘कीड’! तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:11 AM

कोरोनाची एकूण स्थिती आणि यानिमित्ताने सुरु असलेले राजकारण यावर तेजस्विनी पंडितने तिखट शब्दांत एक पोस्ट केली आहे.

ठळक मुद्देआईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने ‘अगं बाई अरेच्चा.’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे करियरला सुरुवात केली.

देशात कोरोनाने (corona) अक्षरश: थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर स्थिती गंभीर आहेत. रूग्णांचा आणि मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. रूग्णालयांत पुरेसे बेड नाहीत, पुरेसा ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर औषध नाही, रूग्णवाहिका नाहीत, अशा स्थितीत रूग्णांचे, त्यांच्या आप्तांचे अतोनात हाल होत आहेत. दुसरीकडे काय तर  रेमडेसिवीर आणि लसींवरून राजकारण सुरू असलेले पाहायला मिळतेय. कोणत्याही संवेदनशील व्यक्तिला या स्थितीचा उबग येईल. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pundit) यापैकीच एक. कोरोनाची एकूण स्थिती आणि यानिमित्ताने सुरु असलेले राजकारण यावर तिने तिखट शब्दांत एक पोस्ट केली आहे. राजकारण ही कोरोनापेक्षा घातक कीड असल्याचे तिने म्हटले आहे. (Tejaswini Pundit  post on politics in country amid corona pandemic)

इन्स्टा स्टोरीवर तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे.  सगळ्यात मोठी ‘कीड’ जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे ‘राजकारण’... ही ‘कीड’ कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वषार्नुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या ‘कीड’पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच....काळजी घ्या,असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त व परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक मुद्यांवर ती मतं व्यक्त करत असते. अभिनयाच्या बाबतीतही तिला तोड नाही.आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने ‘अगं बाई अरेच्चा.’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने गैर, तु ही रे, देवा, ये रे ये रे पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिचा ‘मी सिंधुताई सकपाळ’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने यासोबतच तुझं नि माझं घर श्रीमंताचं, १०० डेज यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.   

टॅग्स :तेजस्विनी पंडित