गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सेलिब्रेटींना वरचेवर ट्रोल केलं जातं. त्याला मराठी सेलिब्रेटीदेखील अपवाद नाहीत. अनेकदा काही सेलिब्रेटी ट्रोलर्सना चांगले खडे बोल सुनावतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितही सोशल मीडियावर ट्रोलर्सना प्रतिउत्तर देताना आपल्याला अनेकवेळा दिसते. आता तेजस्विनीने सोशल मीडियावर ट्रोलर्ससाठी एक पोस्ट शेअर करत होती. तेजस्विनी लिहिले, सोशल मीडियावर कृपया वाईट पद्धतीने ट्रोल करणं थांबवा. एखाद्या व्यक्ती कोणत्या अवस्थेतून जात असतो किंवा कोणत्या परिस्थितीशी लढत असतो, कोणत्या मानसिक आजाराने त्याला ग्रासलेलं असते याची तुम्हाला कल्पना जराही नसते. तुमच्या नकारात्मक शब्दांचा त्याच्यावर गंभीपर परिणाम होऊ शकतो. असं तेजस्विनीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तेजस्विनीच्या या पोस्टला मराठी सेलिब्रेटींनी ही पाठिंबा दर्शिवला आहे.
मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.