मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अनेक मराठी सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेत्री म्हणूनच नाही तर ती आता यशस्वी निर्मातीही आहे. तिने दिग्दर्शित केलेला 'येक नंबर' सिनेमा गेल्यावर्षी रिलीज झाला होता. तर 'रानबाजार' वेबसीरिजमध्ये तिने भूमिका साकारली होती. नुकतंच तेजस्विनीने सोशल मीडियावर तिचं एका गोष्टीसाठी प्रेम व्यक्त केलं आहे. काय आहे तिची पोस्ट वाचा.
तेजस्विनीने लाल रंगाच्या साडीत फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. कानात त्याच रंगाचे झुमके घातले आहेत. हातात गुलाबाची फुलंही आहेत. या फोटोंसोबत तेजस्विनीने कॅप्शनमध्ये लिहिले, "माझं न संपणारं प्रेम (साडीसाठीचं) जमलंय ?? माझ्या बालमित्राने मला साडी आवडते म्हणून मागच्या वाढदिवसाला गिफ्ट दिली होती. ती खूप दिवसांनी खणातून बाहेर काढली आणि इव्हेंटसाठी नेसली. साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही. बरोबर ना? "
तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. 'सुंदर','परम सुंदरी' असं म्हणत चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. अभिजीत खांडकेकर, अमृता देशमुख, प्रार्थना बेहेरे, श्रुती मराठे, क्रांती रेडकर यां कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.