महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे घराघरात चाहते आहेत. तेजस्विनी लग्न कधी करणार, तिचा क्रश कोण हे जाणून घ्यायला चाहते कायमच उत्सुक असतात. नुकतंच तेजस्विनीने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. शिवाय, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता क्रश असल्याचं तिनं सांगितलं.
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने 'लोकमत फिल्मी'च्या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. आयुष्यात कधी सेटल होणार आहे, या प्रश्नावर ती थेटच बोलली. तेजस्विनी म्हणाली, 'मी सेटल आहे. कुणाशीही लग्न करणं किंवा आयुष्यात पुरुष असणं हे म्हणजे सेटलं होणं नाही. मी माझ्या कुटुंबाला सांभाळते. मी काम करतेय. मी अभिनय करतेय. मी निर्माती आहे आणि सर्व मजेत सुरु आहे. यासाठी मला कोणत्याही पुरुषाच्या पावतीची गरज नाही.
मुलाखतीत तेजस्विनी तुझा क्रश कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिलं की, अंकुश चौधरीवर माझं मेजर क्रश होतं. आणि शेवटी त्यांच्यासोबत कामचं केलं. मी एका जाहिरातीसाठी मी पहिलं ऑडिशन दिलं होतं. ३० ते ३६ मुलींमधून पहिल्याचं झटक्यात माझी निवड झाली. थेट सरळ मला अकुंश चौधरी यांच्याबरोबर काम करायला मिळाल. माझ्याकडे एक टोपी होती. त्यावर मी अकुंश सरांची सही घेतलेली. ती टोपी मी खूप काळ मिरवली सुद्धा. क्रश असणं म्हणजे काय असतं. एकदम हार्मलेस गोष्ट असते ती. खूप छान वाटतं".
शिवाय, तेजस्विनीचं नाव दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तिने आता तिची बाजू मांडली. 'जिथे मी त्याला दादा म्हणते तिथेच माझ्यासाठी सगळं संपतं. मला उत्तर द्यायची पण गरज नाहीये. आपल्या जेव्हा माहीत असतं की समोरची व्यक्ती आपल्या बापारुपी किंवा दादारूपी आहे. तिथे वेगळे विचार काय येणार' असं ती म्हणाली आहे.
तेजस्विनीची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तेजस्विनी अभिनयाशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. 'बांबू' हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट.तसंच 'अथांग' या थरारक वेबसिरीजचीही तिने निर्मिती केली आहे. तेजस्विनीने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. 'तू ही रे', 'येरे येरे पैसा', 'अगं बाई अरेच्चा', 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटांत ती झळकली.