आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही ना काही सामाजिक संदेश देत असते. तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टरांना आणि दुस-या दिवशी पोलिसांचे आभार मानले. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिने समस्त सफाई कर्मचा-यांचे आभार मानले आहेत.
हातात झाडू घेऊन रस्त्यावर उभी ठाकलेली रणरागिणी आपल्या फोटोमधून तेजस्विनीने साकारलीय. तेजस्विनी पंडित तिसऱ्या दिवशीच्या फोटोशूट विषयी सांगते, “दुर्गामातेने आपल्या शक्तीशाली त्रिशुळाने असुराचा वध केला होता. कोरोनारूपी असूराला पळवून लावायचे असेल, तर स्वच्छता आणि सॅनिटायझेशन महत्वाचेच ना.. कोरोना काळात स्वच्छता कर्मचा-यांच्या हातातल्या मोठ्या झाडुने ही त्रिशुळाचेच तर काम केले होते. त्यांच्यातल्या त्या दैवी कर्मांमुळेच तर आपण प्रत्येक गल्ली-बोळात, गावात, पाड्यात, शहरात स्वच्छता पाहू शकतोय.”
तेजस्विनी पंडित पुढे म्हणते, “आपण लहानपणापासून ऐकलंय, जिथे स्वच्छता असेल. तिथेच लक्ष्मीचा वास असतो. आणि वर्षाचे 365 दिवस दारोदारी स्वच्छता करण्याचं काम हे सफाई कर्मचारी करतात. त्यांच्यातल्या दैवीरूपाला माझे ह्या फोटोशूटव्दारे नमन.”
ननवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची विविध रुपे साकारण्याची आगळीवेगळी संकल्पना अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं प्रत्यक्षात उतरवली. गेल्या काही वर्षापासून तिनं साकारलेली 'नवदुर्गा' प्रेक्षकांना भावली आहेत.