मराठी कलाविश्वात आजवर अनेक धाटणीच्या चित्रपट, वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली. परंतु, सध्या सोशल मीडियावर रानबाजार या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. मराठीमध्ये पहिल्यांदाच इतक्या बोल्ड कंटेन्टच्या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejasswini Pandit )आणि प्राजक्ता माळी (RaanBaazaar) मुख्य भूमिका साकारत असून या सीरिजचा पहिले तीन एपिसोड रिलीज झालेत.. या सीरिजमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा सुरु आहे. यामध्येच बोल्ड सीन देण्याविषयी तेजस्विनीच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सत्य घटनांच्या संदर्भावर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींचे प्रचंड बोल्ड सीन पाहायला मिळत आहेत. या सीनविषयी तेजस्विनीची आई म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तेजस्विनी पंडितच्या आई अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर रानबाजारचे एक पोस्टर पोस्ट केलं आहे. यात तेजस्विनीचा देखील फोटो आहे. ज्योती चांदेकर यांनी ही पोस्ट शेअर करत कॅपशनमध्ये समीर परांजपे यांनी लिहिलेला लेख पोस्ट केला आहे. ''रानबाजार वेबसीरियल वरून जे रान उठले आहे, त्यावरून लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. बोल्ड सीन आणि जरा भडक भाषेने इतके भेदरून जायचे मुळात कारण काय? ज्यांनी नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा काव्यसंग्रह वाचला असेल, ज्यांना देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या स्थितीबद्दल नीट कल्पना असेल त्यांना रानबाजारसारख्या सीरियल अगदी मामुली वाटतील. त्यातील अभिनेत्रींनी जी काही कथित धाडसी दृश्ये दिली आहेत त्यापेक्षा अधिक उत्तेजक असे बरेच काही इंटरनेटवर सहजी उपलब्ध असते. आणि ते कोण कोण पाहाते याबद्दल बेधडकपणे लिहिले तर अनेकांची भारतीय संस्कृती लगेच डळमळीत होईल. रानबाजार वेब सिरीयल दिग्दर्शित करणारे, ती लिहिणारे तुमच्या आमच्यासारखेच चांगल्या घरातील आहेत आणि त्यात अभिनय करणारेही कोणी उठवळ नाहीत.
रानबाजार ही एक कलाकृती आहे. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे. उगाच अनेक लोक स्वतः आयुष्यात पाळत नसलेल्या मूल्यांचे समाज माध्यमावर स्तोम माजवत बसतात तेंव्हा त्यांची शरम वाटते. जगात जे गलिच्छ असते असे मानले जाते ती आपल्याच समाजाची घाण असते. ती स्पष्टपणे दाखवणे यात काहीही चूक नाही. रानबाजार असे त्या मालिकेचे नाव असले तरी खरे नाव त्यामुळे प्रत्येकाच्या मनात येतेच. इथूनच त्या मालिकेच्या यशाला सुरूवात होते. समाजाचे सत्य न्यूड स्वरूपात दाखवणे सध्याच्या काळात तर आवश्यकचआहे. कारण नको त्या गोष्टी तकलादू मूल्यांच्या पदरात लपवून ठेवणाऱ्या लोकांना सध्या सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळे रानबाजारला विरोध होणे स्वाभाविकच. पण या मालिकेला एक प्रेक्षक म्हणून माझा निर्विवाद पाठिंबा आहे.- समीर परांजपे.प्रिय समीर,मी तुम्हाला प्रत्यक्षात ओळखत नाही पण एक प्रेक्षक म्हणून आणि मुख्य म्हणजे एक आई म्हणून अगदी योग्य शब्दात तुम्ही माझ्या भावनांची मांडणी केलीत. धन्यवाद आणि आशिर्वाद !एक खरी आणि धाडसी वेब मालिका केल्याबद्दल एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून अभिजीत पानसे ह्यांचे अभिनंदन !जरुर बघा माझ्या लेकीला आणि अनेक मातब्बर कलाकारांना "रानबाजार" या वेब मालिकेत.आजपासून प्रदर्शित होतोय प्लेनेट मराठी app वर.'' अशा शब्दांत ज्योता चांदेकर यांनी लेकीच्या कामाचं कौतुक करत ट्रोर्लसना चांगलंच सुनावलं आहे.
'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट! 'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अॅप इन्स्टॉल करा आत्ताच! अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS