Join us

'काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय'; 'कुर्रर्रर्र' नाटक सोडल्यानंतर नम्रताची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 1:04 PM

Namrata sambherao: नुकताच या नाटकातून नम्रताने काढता पाय घेतला आहे. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या.

आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता आवटे-संभेराव ( namrata sambherao). महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी नम्रता कुर्रर्रर्र या लोकप्रिय नाटकातही काम करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच तिने हे नाटक सोडलं. नाटकातून नम्रताने काढता पाय घेतल्यामुळे प्रेक्षकवर्ग काहीसा नाराज झाला. मात्र, अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत हे नाटक सोडण्यामागचं कारण सांगितलं. "कुर्रर्रर्र' ह्या नाटकातली माझी भूमिका पूजा I will miss u so much show must go on. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक. माझी भूमिका मी अक्षरशः जगले. माझ्या आयुष्यातलं अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस ह्याच नाटकाने मिळवून दिलं मला. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं प्रेम केलं, अत्यंत व्यस्त schedule मधून आम्ही कुर्रर्रर्र ह्या नाटकाचे 2 वर्षात 200 हुन अधिक प्रयोग केले. पण व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली backstage आणि सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावे ह्यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो पहिल्यांदा अनुभवला पण हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे नाटकासाठी च घेतला आहे आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्विकार कराल अशी खात्री आहे. ह्यापूर्वी जसं प्रेम केलंत तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या कुर्रर्रर्र ह्या नाटकावर नवीन संचावर कराल अशी अशा आहे , मी अजूनही आमच्या म्हणतेय कारण शारीरिक रित्या exit घेतली तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेलेय , तिथून कधीच exit होत नसते . माझ्या शुभेच्छा कायम सोबत असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई विनोदाचा बाप पॅडी दादा माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि supreme प्रियदर्शन दादा तुम्हाला व कुर्रर्रर्र च्या सर्व टीम ला पुढील प्रयोगांसाठी housefull शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही", अशी पोस्ट नम्रताने शेअर केली आहे.

दरम्यान, नम्रताने 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या.  इतकंच नाही तर 'बाबू बँड बाजा' , 'व्हेंटिलेटर' या चित्रपटातही ती झळकली आहे.

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्रा