Join us

मृणाल कुलकर्णी आणि रितिका श्रोत्रीमध्ये आहे हे नातं, खुद्द अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली - 'ती विराजसच्या...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 14:02 IST

Mrinal Kulkarni : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. गेली अनेक वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तर आता त्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्या सरी चित्रपटात झळकणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात रितिका श्रोत्री(Ritika Kshotri)देखील मुख्य भूमिकेत आहे. 

मृणाल कुलकर्णी आणि रितिका श्रोत्री याआधीही मालिका, चित्रपटांमध्ये एकत्र दिसल्या होत्या. त्या दोघींमध्ये खास नाते आहे आणि या नात्याचा याचा उलगडा मृणाल कुलकर्णी यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, रितिकाला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखते. तिने आमच्या ‘गुंतता हृदय हे’ मालिकेत काम केले होते. त्यानंतर मी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातही तिने काम केले होते. ती आमच्या पुण्याची मुलगी आहे. अनेक वर्षे ती विराजसच्या थिएट्रॉन या नाटकाच्या ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे मी तिला बरीच वर्षे ओळखते, ती लहान असल्यापासून मी तिला पाहत आले आहे.

टॅग्स :मृणाल कुलकर्णी