Join us  

'पाणी' चित्रपटातील 'तुया साथीनं' रोमँटिक गाणं प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 5:04 PM

Paani Movie : 'पाणी' या चित्रपटातील एक नवीन रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'तुया साथीनं' असे बोल असणारं हे प्रेमगीत आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

'पाणी' या चित्रपटातील एक नवीन रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'तुया साथीनं' असे बोल असणारं हे प्रेमगीत आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हळूहळू बहरत जाणारे, नजरेतून व्यक्त होणारे हे प्रेमगीत अतिशय श्रवणीय आहे. आदिनाथ कोठारे याने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला गुलराज सिंग यांचे संगीत लाभले आहे. तर गुलराज सिंग आणि साशा तिरुपती यांच्या सुमधुर आवाजानं हे गाणे अधिकच बहारदार बनलेले हे भावपूर्ण गाणे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारे आहे. 

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटाचे नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी 'पाणी' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणाला की, "हनुमंत आणि सुवर्णा यांच्यात हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहेत. एकमेकांबद्दलची ओढ या गाण्यातून दिसतेय. या चित्रपटाच्या लेखनाबरोबर गाण्याचे बोल लिहिण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे. शब्द जरी माझे असले तरी गुलराज यांच्या संगीताने आणि आवाजाने तसेच साशाच्या आवाजाने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. संगीतप्रेमींना हे गाणे नक्कीच आवडेल.'' 

टॅग्स :आदिनाथ कोठारे