Join us

​ नाटकाला सापडेना मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2017 11:57 AM

सध्या रंगभूमीवर एक से बढकर एक अशी दर्जेदार नाटके पाहायला मिळत आहेत. कलाकार देखील त्यांच्या बिझी शेड्युल्डमधुन वेळ काढून ...

सध्या रंगभूमीवर एक से बढकर एक अशी दर्जेदार नाटके पाहायला मिळत आहेत. कलाकार देखील त्यांच्या बिझी शेड्युल्डमधुन वेळ काढून नाटकांना पसंती देताना दिसत आहेत.  नोटाबंदीच्या काळात देखील नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल झालेले आपण पाहीले आहे. असे असताना देखील जर एखादया नाटकाला मुहूर्तच लागत नाही असे जर तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल ना. पण हो तसेच काही झाले. आॅल द बेस्ट या भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर या त्रिकुटाचे नाटक त्याकाळी चांगलेच गाजले होते. जवळपास तेवीस वर्षांपुर्वी रंगमंचावर आलेल्या या नाटकाने या तिघांनाही ओळख मिळवून दिली. त्यानंतर आज मराठी चित्रपटसृष्टीतील हे तिघेही स्टार्स झाले आहेत. चित्रपटांमध्ये यांनी आपली नावे कमावली आहेतच. परंतू हे नाटक पुन्हा याच तिघांना एकत्र घेऊन करणार असल्याचे मध्यंतरीच बोलले जात होते. ३१ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. त्यामुळे ३१ डिसेंबरलाच पुन्हा हे नाटक या तिघांना घेऊन करणार असल्याची घोषणा सिनेमंत्रा या निर्मिती संस्थेने केली देखील होती. पण आता नवीन वर्ष सुरु झाले तरी हे नाटक रंगमंचावर आले नाही, की त्याच्या तालमी देखील सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे नाटक पुन्हा रंगभूमीवर कधी येणार हे त्यातील कलाकारांना सुदधा माहित नाहीये. आॅल द बेस्ट या नाटकाचे अनेक प्रयोग वेगळ््या कलाकारांनी देखील केले आहेत. परंतू अंकुश,भरत आणि संजयची धमाल केमिस्ट्री पुन्हा अनुभवण्याची संधी नाट्यरसिकांना या निमित्ताने मिळणार होती. त्यामुळे आता हे नाटक रंगमंचावर यायाला अजुन किती वाट पाहावी लागणार हे काही सांगु शकत नाही.