'दादा मी प्रेग्नंट आहे' या होर्डिंगचा प्रिया बापटशी काही आहे का संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 09:00 AM2018-12-03T09:00:00+5:302018-12-03T09:00:02+5:30
मुंबईमधल्या दादर येथील प्रभादेवी परिसरात सध्या एक अतिशय वेगळे पण इंटरेस्टिंग होर्डिंग पाहायला मिळते आहे. या हॉर्डिंगची या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
मुंबईसारख्या शहरात हॉर्डिंग्स लागणे यात काही नवीन नाही. अनेक कंपन्या आपल्या जाहिराती करण्यासाठी विविध ठिकाणी हॉर्डिंग्स लावत असतात. एवढेच नव्हे तर राजकीय पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला देखील मोठमोठी हॉर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. पण सध्या मुंबईत दिसणारे हे हॉर्डिंग्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
मुंबईमधल्या दादर येथील प्रभादेवी परिसरात सध्या एक अतिशय वेगळे पण इंटरेस्टिंग होर्डिंग पाहायला मिळते आहे. या हॉर्डिंगची या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तसे म्हटले तर दादर हे मुंबईतील सगळ्यात वर्दळीचे ठिकाण... या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी देखील लोक आवर्जून येतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच प्रचंड गर्दी असते. प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यग्र असतो. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या हॉर्डिंगकडे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे देखील सहसा लक्ष जात नाही.
पण दादरमध्ये नुकतेच एक हॉर्डिंग लावण्यात आलेले आहे आणि त्यावर लिहिण्यात आलेले आहे की, "दादा मी प्रेग्नंट आहे." या हॉर्डिंगवरील हे शब्द वाचून हे काय आहे याचा अर्थ लोकांना लागत नाहीये. आम्हाला अंदाज लावणे देखील कठीण जात आहे असे काहींचे म्हणणे आहे. कारण काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगचे देखील "कार्ड मिला क्या" नावाने होर्डिंग्स लागले होते... आणि या होर्डिंग नंतर लगेचच कोटक महिंद्राने एक कार्ड बाजारात आणले हे एक व्यावसायिक होर्डिंग होते. याशिवाय "शेवडे आय एम सॉरी" या नावाचे देखील ४०० होर्डिंग पुण्यात लागले होते. हे खाजगी होर्डिंग एका प्रियकराने आपल्या प्रेयसी साठी लावले होते.
आता 'दादा मी प्रेग्नंट आहे' या होर्डिंगचा नक्की काय अर्थ आहे? हे होर्डिंग व्यावसायिक आहे की खाजगी आहे याचा अंदाज लावला जात आहे. ‘एक गोड बातमी आहे’ या कॅप्शनसह उमेश कामातने प्रिया बापटला प्रेमाने जवळ घेतलेला सुंदर आणि रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे याचा देखील काही संबंध या होर्डिंगशी आहे का याची देखील चर्चा सुरू आहे.