Join us

"सत्तेत कोणी का असेना"; मराठमोळी अभिनेत्री भडकली, सोबतीला 'मनसे' आली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 3:42 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान तेजस्विनी पंडितने स्वत:च्या सोशल मीडियावर शेअर केले

मनसेनं पुन्हा एकदा टोलमाफीचा मुद्दा उपस्थित केला असून राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर केलेलं विधान आणि प्रत्यक्षात मोठी विसंगती दिसून आल्यानंतरही मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. टोलमाफीच्या या मुद्दयावर मराठमोळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने थेट भूमिका घेतल्याचं दिसून आलं. मात्र, तिने भूमिका घेतल्यानंतर तिच्या ट्विटर अकाऊंटचं व्हेरीफिकेशन बॅग काढून टाकण्यात आल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान तेजस्विनी पंडितने स्वत:च्या सोशल मीडियावर शेअर केले. म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? असा सवाल तेजस्विनीने सरकारला विचारला आहे. तसेच, तिने मनसे प्रमुख राज ठाकरेंना आवाहन केले की, राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं कसं वागू शकतात…असेही अभिनेत्रीने म्हटले होते. तिच्या या ट्विटची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर, आता तेजस्वीनीने आणखी एक पोस्ट करत कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही, असे म्हणत सरकारला लक्ष्य केलं आहे. 

माझ्या X (ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?

X (टूट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात, त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत ! जेंव्हा जेंव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे ! जय हिंद जय महाराष्ट्र !, असे तेजस्वीनीने म्हटले आहे. दरम्यान, तेजस्वीनीला मनसेनंही साथ दिली असून तेजस्वीनीची पोस्ट रिशेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, हॉलिवूड कलाकारांच्या सन्मानाचं उदाहरण देत, आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही स्वतःला म्हणवतो आणि आमच्या हल्लीच्या राज्यकर्त्यांना किंचितशीही टीका सहन होत नाही, असे मनसेनं म्हटलं आहे. 

टॅग्स :तेजस्विनी पंडितदेवेंद्र फडणवीसमनसेटोलनाका