Join us

संस्कृतीच्या खांद्याला दुखापत पण काळजी नसावी....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 7:09 AM

अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्या फॅन्ससाठी एक बातमी आहे. संस्कृती बालगुडे हिच्या खांद्याला दुखापत झाली आहे. संस्कृतीने तिचा एक फोटो ...

अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्या फॅन्ससाठी एक बातमी आहे. संस्कृती बालगुडे हिच्या खांद्याला दुखापत झाली आहे. संस्कृतीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या खांद्याला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे. खांद्याला दुखापत झाली असली तरी संस्कृतीच्या चेह-यावरील उत्साह आणि हसू काही कमी झालेलं नाही. खांद्याची ही दुखापत फारशी काळजी करण्यासारखी नसल्याचं संस्कृतीनं सांगितले आहे. याशिवाय लडाखला जाणार असल्याची माहिती संस्कृती बालगुडेनं दिली आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लडाखला जात असल्याचे तिनं म्हटलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सारेच उत्सुक असल्याचे संस्कृतीने सांगितले आहे. हा एक डान्स शो असून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्या असं आवाहनही संस्कृतीने केले आहे. काही दिवसांपूर्वी संस्कृतीचा फ्रेंडशिप अनलिमिटेड – एफयू हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता. या सिनेमानंतर संस्कृती आता लडाखमधील या शोच्या तयारीला लागली आहे.तसेच संस्कृती विठ्ठलाचीही भक्त आहे.नुकतेच तिने विठ्ठलाच्या वारीत जावून भक्तांसह विठ्ठलाची भक्ती केल्याचे पाहायला मिळाले. शूटिंगच्या वेळेतून पूर्ण वारीत सहभागत घेता येत नसला तरी जमेन तसं वेळ काढून वारीत सहभाग घेत भक्तीरसा मग्न झाल्याचे पाहायला मिळाले. सस्कृतीसह  तेजा देवकर, आणि भार्गवी चिरमुले या मराठी अभिनेत्रींही  सहभागी झाल्या आणि टाळ-मृदुंगाच्या साथीने त्यांनी विठू रायाचा गजर केला.वारीतला एक फोटो संस्कृतीने तिच्या फेसबुक पेजवर पोस्ट केला असून हा फोटो पाहून तिच्या अनेक चाहत्यांनीही वारीतला त्यांचे अनूभव संस्कृतीसह शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र खांद्याला दुखापत झाल्याचे फोटो पाहून  कितीही वेदना होत असल्या तरी तिच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे.