उर्मिला कानेटकर - क्रांती रेडकरउर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर एकमेकांच्या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. क्रांतीने दिग्दर्शित केलेल्या काकण या पहिल्या चित्रपटात देखील आपल्याला उर्मिलाला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते.
नेहा पेंडसे - श्रुती मराठेनेहा पेंड्से आणि श्रुती यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा ऐकायला मिळते. त्या दोघी त्यांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असल्या तरी त्या एकमेकींसाठी नेहमीच वेळ काढतात. त्या दोघींचे अनेक फोटो आपल्याला सोशल मीडियावर देखील पाहायला मिळतात.
आदिनाथ कोठारे - वैभव तत्त्ववादीवैभव तत्त्ववादी आणि आदिनाथ कोठारे यांच्या मैत्रीला अनेक वर्षं झाले असून ते दोघे नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतात.
भरत जाधव - अंकुश चौधरी - केदार शिंदेभरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे यांची मैत्री त्यांच्या स्ट्रगलिंग काळापासूनची आहे. त्या तिघांनीही आता मराठी चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली असून त्यांच्या मैत्रीचे किस्से ते अनेकवेळा मुलाखतींमध्ये शेअर करतात.
तेजस्विनी पंडित - स्पृहा जोशीनांदी या नाटकादरम्यान स्पृहा आणि तेजस्विनी यांची मैत्री झाली. आज इतक्या वर्षांनी देखील त्यांची मैत्री टिकून आहे.
सचिन पिळगांवकर - अशोक सराफ सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांची मैत्री मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले असून सचिन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात आपल्याला नेहमीच अशोकला पाहायला मिळते.
स्वप्निल जोशी - सई ताम्हणकरस्वप्निल आणि सई यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची पहिली ओळख ही गिरिजा ओकमुळे झाली होती. त्यांच्याच काहीच दिवसांत मैत्री झाली आणि त्यांचे हेच बॉण्डिंग आपल्याला त्यांच्या चित्रपटात देखील पाहायला मिळते.
पुष्कर श्रोती आणि प्रसाद ओकपुष्कर आणि प्रसाद यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण २५ दिवस नेपाळमध्ये झाले होते. यावेळी ते दोघे रूम पार्टनर असल्याने त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. आजही त्यांची मैत्री कायम आहे.