Join us

'थेट काळजात घुसली तू', रिंकू राजगुरूच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:35 IST

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्चीच्या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्राला सैराट करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (Rinku Rajguru). नागराज मंजुळे यांचा सैराट गाजल्यानंतर रिंकू राजगुरूने कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा अशा कितीतरी चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केले. दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ होताना दिसत आहे. रिंकूदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते. बऱ्याचदा नवनवीन पोस्ट शेअर करत असते. दरम्यान आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने वेगवेगळ्या पोझमधील फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओतील तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत रिंकूने पर्पल रंगाचा टॉप घातला आहे आणि पीच रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. या गेटअपमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 

रिंकू राजगुरूच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, थेट काळजात घुसली तू. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, जितनी तारीफ आपकी कम है. तर आणकी एका युजरने लिहिले की, किती सुंदर आणि क्युट दिसतेस.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच छुमंतर या मराठी चित्रपटात झळकणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि रिषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग पार पडले.

टॅग्स :रिंकू राजगुरू